Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या अभिनेत्याला कन्यारत्न, सोशल मीडियावर दिली ही खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 12:35 IST

अभिनेत्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही खुशखबर शेअर केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक सुहृद वर्डेकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच सुहृदने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आनंदाची वार्ता दिली आहे. तो बाबा झाला असून त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

सुहृद वर्डेकरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बाळाच्या पावलांचा फोटो शेअर करत सांगितले की, मी वडील झालो. आज मला मुलगी झाली.  २९ जानेवारी २०२० रोजी सुहृद वर्डेकरने प्राची खडतकर हिच्यासोबत लग्न केले होते.

सुहृद वर्डेकर हा मराठी मालिका अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून सुहृदने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. या मालिकेत येण्याआधी सुहृदने रेडिओ जॉकी म्हणून लोकप्रियता मिळवली होती इथूनच त्याला अभिनयाची खरी संधी मिळाली होती. रेडिओ जॉकी करता त्याची अनेक मराठी कलाकारांशी ओळख झाली. या ओळखीमुळे सुहृदला अभिनयाची आवड निर्माण झाली आहे. 

एक घर मंतलेलं, दाह- एक मर्मस्पर्शी कथा या काही मालिकेत तो पहायला मिळाला. एक घर मंतरलेलं या मालिकेत सुयश टिळक आणि सुरुची आडरकर यांच्यासोबत त्याची महत्वाची भूमिका होती.

तसेच गोव्याच्या किनाऱ्यावर…. या गाण्याला युट्युबवर अनेक हिट मिळाले आहेत. या गाण्यामुळे सुहृद वर्डेकर आणि सिद्धी पाटणे यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. या गाण्याचे दिग्दर्शनदेखील सुहृदनेच केले होते.

गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्याच्या हिट नंतर सुहृद आणि सिद्धी पाटणे यांनी बऱ्याच व्हिडीओ सॉंग एकत्रित केले आहेत.