Join us

"तर हे 'माहेरचे'देखील तेवढेच दोषी..." वैष्णवी हगवणे प्रकरणावर आस्ताद काळे संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 15:21 IST

"कायदा हा माणसांसाठी असतो, हैवानांसाठी नाही...", वैष्णवी हगवणे प्रकरणावर आस्ताद काळे भडकला

Vaishnavi Hagwane Death Case : पिंपरी चिंचवड मधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सासरच्या मंडळींच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून तिने स्वतच आयुष्य संपवलं. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची ती सून होती. तिच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी पती, सासू, नणंद, सासरा आणि दीर यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे, जमीन खरेदीसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हा छळ सुरू झाला होता, असेही कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. यासंदर्भात आता मराठी सृष्टीतूनही खंत व्यक्त केली जात आहे. अशातच अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale)  याचीही पोस्ट चर्चेत येत आहे. या प्रकरणी आस्ताद काळेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आपलं मत मांडलं आहे. 

अभिनेता आस्ताद काळे हा त्याच्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखला जातो. अशातच त्याने नुकतीच फेसबुक अकाउंट वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी खरमरीत पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये अभिनेत्याने म्हटलंय, "आपल्या मुलींच्या अवस्थेबद्दल, परिस्थितीबद्दल आई-वडिलांना किंवा घरच्या इतरांना काहीच माहीत नसतं? की माहीत असूनही हे कोणी पाठिंबा देत नाहीत?? यापुढे आणखी एक पोस्ट लिहून अस्तादने या प्रकरणाकडे अनेकांचं लक्ष वेधलंय. तसं असेल तर हे "माहेरचे"देखील तेवढेच दोषी आहेत ना?? संपूर्ण कुटुंबाला जनतेच्या विशेषत: स्त्रीयांच्या हवाली करायला हवं. हुंडा मागणाऱ्या हलकटांच्या मनात दहशत बसली पाहिजे. कायदा हा माणसांसाठी असतो, हैवानांसाठी नाही." अशा भाषेत त्याने पोस्ट लिहून राग व्यक्त केला आहे. 

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आधीच पती, सासू आणि नणंद यांना अटक केली होती. मात्र, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे गेल्या सात दिवसांपासून फरार होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ४:३० च्या सुमारास पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हे दोघे अखेर जेरबंद झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. सध्या दोघांची कसून चौकशी सुरू असून, वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार ठरवून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :अस्ताद काळेवैष्णवी हगवणेपुणेगुन्हेगारी