मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आणि अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. मन उडू उडू झालं या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. अजिंक्य सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. सध्या अजिंक्यच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. या पोस्टमधून त्याने वडील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अजिंक्यने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एका लहान मुलासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. पोस्टमध्ये तो म्हणतो, "मला खरं खरं सांगा...तुम्हाला कधी पालक होण्याची इच्छा झाली आहे का? पण त्याचवेळी लग्नाची भीती वाटली का? कधीकधी आयुष्यातील खूप छोटे क्षणही तुमच्या हृदयात घर करतात. आज शूटिंग करताना मन उडू उडू झालं मालिका बघणारी एक केअरटेकर चाहती माझ्यासोबत फोटो काढायला आली. मी त्या छोट्या मुलाला हाय करताच तोदेखील माझ्याकडे धावत आला. जेव्हा काही क्षण तो माझ्याजवळ होता तेव्हा माझ्या आतमध्ये काहीतरी बदलल्यासारखं वाटलं. माझ्या मनात तेव्हा पहिल्यांदा विचार आला की मलाही एक दिवस वडील व्हायचं आहे. पण दुसऱ्याच क्षणी मला जाणवलं की मला लग्नाची किती भीती वाटते. कारण ही एक खूप मोठी जबाबदारी आहे".
"आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल. पालक बनण्याची इच्छा आहे पण आजच्या जगात लग्नाची भीती वाटते. पण त्या क्षणी मला जाणवलं की निस्वार्थ प्रेम अजूनही जगात आहे. मुलं म्हणजे खरंच देवाघरची फुलंच असतात. आपल्यापैकी प्रत्येकाला एक ना एक दिवस योग्य जोडीदार नक्कीच मिळेल. आणि त्याच्या सोबतीने सुंदर आयुष्य घडवण्याचंही धैर्य मिळेल", असंही त्याने पुढे म्हटलं आहे. अजिंक्यच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
Web Summary : Actor Ajinkya Raoot shared his desire to become a father after an interaction with a child on set. He also expressed his fear of marriage and the responsibilities it entails, sparking conversation among his fans.
Web Summary : अभिनेता अजिंक्य राऊत ने एक बच्चे के साथ बातचीत के बाद पिता बनने की इच्छा व्यक्त की। उन्होंने शादी और इसकी जिम्मेदारियों के डर को भी व्यक्त किया, जिससे उनके प्रशंसकों के बीच बातचीत शुरू हो गई।