Join us
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या भूमिकेत झळकणार मानसी साळवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 13:11 IST

‘पापा बाय चान्स’ मालिकेत सुचरिता चोप्रा ही व्यक्तिरेखा मानसी साकारत आहे. ती दिल्लीतील एक उच्चभ्रू उद्योजिका असून व्यवसाय आणि विवाह यांचा तिने उत्तम मेळ घातलेला असतो.

मराठी मालिकांबरोबरच हिंदी मालिकांमधूनही रसिकांची मनं जिंकली आहेत. 'कोई अपना सा', 'सारथी', 'सती', 'मिठा मिठा प्यारा प्यारा' सारख्या एकाहून सरस आणि दमदार मालिकांमधल्या भूमिकेने मानसी साळवी या मराठी नायिकेनं रसिकांच्या मनावर गारुड घातलंय.आता पुन्हा एकदा मानसी हिंदी मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘पापा बाय चान्स’ मालिकेत सुचरिता चोप्रा ही व्यक्तिरेखा मानसी साकारत आहे. ती दिल्लीतील एक उच्चभ्रू उद्योजिका असून व्यवसाय आणि विवाह यांचा तिने उत्तम मेळ घातलेला असतो.

आपल्या या भूमिकेबद्दल उत्सुक असून तिने सांगितले की, “सुचरिताची भूमिका ही जणू माझ्यासाठीच तयार केली आहे. कारण या भूमिकेसाठी मला स्क्रीन टेस्टही द्यावी लागली नाही इतकी मी निर्मात्यांना या भूमिकेसाठी योग्य वाटली. यामुळे माझं या व्यक्तिरेखेशी एक वेगळंच नातं निर्माण झाले आहे. त्याशिवाय मला या भूमिकेच्या ज्या दोन गोष्टी आवडतात त्या म्हणजे तिचे कपडे आणि ज्या नजाकतीने तिची व्यक्तिरेखा रेखाटली आहे, ती सुस्पष्टता. त्यामुळे प्रेक्षकांना ‘पापा बाय चान्स’ मालिकेतील माझी ही नवी भूमिका नक्कीच आवडेल, याचा मला विश्वास आहे.”

सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे. अशीच एक नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ‘पापा बाय चान्स’ या मालिकेचे प्रोमो प्रसारित झाल्यापासून रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे आपल्या मस्त उडत्या चालींवर लोकांना डान्स करायला लावल्यानंतर रफ्तार आता भारतीय टेलिव्हिजनवर स्क्रीन धमाका उडवणार आहे. स्टार भारतवरील आगामी कौटुंबिक मालिका पापा बाय चान्समधील बिनधास्त दिल्ली बॉय युवानची ओळख करून देताना रफ्तार रॅपिंग करेल. वाहिनीने एखाद्या व्यक्तिरेखेची ओळख अशा पद्धतीने फारच कमी वेळा केली असेल. वाहिनीने शोधून काढलेला झेबी सिंग हा युवानच्या व्यक्तिरेखेसाठी अगदी अनुरूप असून युवानला वर्तमानात जगायला आवडते आणि नातेसंबंधांमध्ये फार न गुरफटणे हा त्याचा मंत्र आहे। देखणा मॉडेल झेबी पापा बाय चान्समधून अभिनयामध्ये पदार्पण करत आहे.