Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’मध्ये मनोज गोयलची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 16:24 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या ‘क्या हाल,मिस्टर पांचाळ?’ मालिकेत नव्या कलाकारांची एंट्री होणार आहे.श्रृती रावतच्या प्रवेशानंतर आता मालिकेचा ...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या ‘क्या हाल,मिस्टर पांचाळ?’ मालिकेत नव्या कलाकारांची एंट्री होणार आहे.श्रृती रावतच्या प्रवेशानंतर आता मालिकेचा विनोदी बाज अधिक वाढविण्यासाठी आता आणखी एका कलाकाराचा प्रवेश लवकरच मालिकेत केला जाणार आहे. आपल्या विनोदी अभिनयामुळे प्रसिध्द असलेला मनोज गोयल हा मालिकेत प्रवेश करणार असून त्यामुळे ही मालिका अधिकच विनोदी वळण घेणार आहे.मनोज या मालिकेत सत्यप्रकाश ही व्यक्तिरेखा रंगविणार आहे.त्याची व्यक्तिरेखा राजा हरिश्चंद्र या पौराणिक व्यक्तिरेखेवर आधारित असून तो कधी खोटे बोलत नाही.पण त्याच्या सत्यवचनांमुळे इतर लोक अडचणीत येतात आणि मग विनोदी परिस्थिती उदभवते.आपल्या नव्या मालिकेबद्दल मनोज म्हणाला, “मी आतापर्यंत लहानमोठ्या ब-याच भूमिका रंगविल्या असल्या तरी या मालिकेत मला एक पूर्ण लांबीची भूमिका मिळाली आहे. माझ्या खाजगी जीवनात घडलेल्या काही घटनांमुळे मला कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करता येत नव्हतं. पण आता ते सारं मागे टाकून मी पुन्हा अभिनयावर लक्ष केंद्रित करीत असताना मला ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या विद्यमान मालिकेत भूमिका मिळाल्याने मी समाधानी आहे.माझी यातील व्यक्तिरेखा या मालिकेला अधिकच हलकीफुलकी बनवील. या व्यक्तिरेखेचं चित्रीकरण करताना मला मजा येईल याबद्दल माझी खात्री आहे.”Also Read:‘क्या हाल,मिस्टर पांचाळ?’मधील मणिंदरसिंगला कलाकार नाहीतर क्रिकेटपटू व्हायचे होते स्वप्न!छोट्या पडद्यावरली ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेची प्रेक्षकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून या वाहिनीवरील ती सर्वाधिक लोकप्रिय मालिका बनली आहे. मालिकेत कन्हैय्याची भूमिका साकारणा-या मणिंदरसिंगने विनोदाचे अचूक टायमिंग आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. तो स्वत: उत्कृष्ट अभिनेता तर आहेच, पण त्याला भारतीयांच्या सर्वात आवडत्या खेळाचीही- क्रिकेटची- प्रचंड आवड आहे. इतकेच नव्हे, तर त्याला हा खेळ इतक्या उत्तम प्रकारे खेळता येतो की त्याच्या परिसरात त्याला सचिन म्हणूनच ओळखले जाते.पण छोट्या गावातील रहिवासी असल्याने त्याला व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी योग्य मार्गदर्शन लाभले नाही. त्यामुळे त्याला क्रिकेटर बनता आले नाही.क्रिकेटर बनण्याचे त्याचे स्वप्न अपुर्णच राहिले.परिणामी त्याने अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्याने चांगलेच यश मिळविले आहे.अर्थात तरीही क्रिकेटवरील त्याचे प्रेम जराही कमी झाले नसून क्रिकेट खेळण्याची संधी दिसताच तो आनंदाने उडी मारून खेळण्यास सज्ज होतो.त्याच्याशी या विषयावर चर्चा केली असता त्याने सांगितले,“क्रिकेटवर माझं प्रेम निरंतर आहे आणि राहील. मी जर अभिनेता बनलो नसतो, तर मी भारतीय क्रिकेट संघात नक्कीच खेळलो असतो.चित्रीकरणानंतर वेळ असेल,तर मी तेव्हा क्रिकेट खेळतो ''मी शाळेत असताना आमच्या परिसरात होणार-या क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी मी सकाळी लवकर उठायचो. माझे मित्र मला आमच्या विभागातला सचिन तेंडुलकर म्हणायचे.”