Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोज बाजपेयी पोहोचला मराठी मालिकेच्या सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 13:54 IST

सध्या चित्रपट हा मराठी असो या बॉलीवुड चित्रपटाचे प्रमोशन करायचे असेल तर साटं-लोटं हा फार्म्युला चांगलाच रूढ होत चालला ...

सध्या चित्रपट हा मराठी असो या बॉलीवुड चित्रपटाचे प्रमोशन करायचे असेल तर साटं-लोटं हा फार्म्युला चांगलाच रूढ होत चालला आहे. बॉलीवुडचा तगडा अभिनेता मनोज वाजपेयी हा त्याच्या बुधिया सिंह बॉर्न टू रन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या सेटवर पोहोचला. हा चित्रपट ५ आॅग्सटला प्रदर्शित होणार आहे.  मृणाल दुसानिस आणि संतोष जुवेकर यांच्या 'अस्सं सासर सुरेख बाई' ही मालिका सध्या प्रेक्षकांध्ये खूप गाजत आहे. त्यामुळे प्रमोशन फंडासाठी अशा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यत पोहोचण्यासाठी मनोज बाजपेयीने या मालिकेत हजेरी लावली. तसेच बॉलीवुडचा हा स्टारडम असणारा मनोज बाजपेयी पोहोचल्यानंतर सर्वानी खूप मजा मस्ती केलेली दिसत आहे. तसेच प्रत्येकाने या स्टार कलाकारासोबत फोटो काढण्याची संधीदेखील  सोडलेली दिसत नाही.