Join us

'मन धागा धागा जोडते नवा' फेम दिव्या पुगावकरने लग्नाबद्दल केला खुलासा, म्हणाली - "लवकरच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 14:03 IST

Divya Pugaonkar : 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री दिव्या पुगावकर घराघरात पोहचली. या मालिकेनंतर ती मन धागा धागा जोडते नवामध्ये पाहायला मिळत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'मुलगी झाली हो'मधून अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) घराघरात पोहचली. या मालिकेनंतर ती मन धागा धागा जोडते नवामध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली आहे. दिव्याने साकारलेली आनंदी प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. या मालिकेनंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झाली आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान आता दिव्या पुगावकर हिने तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

१९ डिसेंबर, २०२१ मध्ये दिव्या पुगावकर हिचा तिलक समारंभ पार पडला होता. तेव्हापासून तिच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अखेर तिने लग्नाबाबत लवकरच कळेल, असे एका मुलाखतीत सांगितले. दिव्याने नुकतेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली की, हा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत खराही आहे असंही म्हणेण आणि खोटाही. मला लग्न करायचं आहे यात काही शंका नाही. पण ते कधी करायचं आहे? हे लवकरच कळेल.

याशिवाय तिला भावी नवऱ्याबद्दल तुझी काही तक्रार आहे का, असे विचारल्यावर या प्रश्नाचं उत्तर देताना दिव्या म्हणाली की, बऱ्याच आहेत. त्याला जर माझ्या बाजूला इथे बसवले तर साधारण तो या विषयावर एक-दोन तास बोलले. शूटिंगच्या वेळापत्रकामुळे आम्हा दोघांना एकत्र वेळ घालवण्यासाठी खूप कमी मिळतो. वरुन मी त्याच्यावर चिडते आणि त्याचे असे असते की, तुलाच वेळ मिळत नाही म्हणून आपण भेटत नाही. तो सतत मला एक गोष्ट म्हणत असतो, चीड चीड कमी कर.