Join us

मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:01 IST

या मुसळधार पावसातही अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू शूटिंगसाठी पोहोचले आहेत. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

मुंबई आणि उपनगरांत कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबई आणि उपनगरांना आज अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या मुसळधार पावसातही अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू शूटिंगसाठी पोहोचले आहेत. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

मंदारने शेअर केलेल्या या व्हिडीओत कमरेइतकं पाणी भरलेलं दिसत आहे. या पाण्यातून वाट काढत गिरिजा प्रभू आणि तो चालत असल्याचं दिसत आहे. "मनोरंजनाला ब्रेक नाही" असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. मुसळधार पावसातही घरी न बसता साचलेल्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत मंदार आणि गिरिजाने मालिकेचा सेट गाढला आहे. पण, यामुळे त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

दरम्यान, मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू हे सध्या 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत यश आणि कावेरीची भूमिका साकारत आहेत. याआधी त्यांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत जयदीप आणि गौरीची भूमिका साकारली होती. त्यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना पसंत पडते. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह