Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन उडु उडु झालं' मालिकेत इको फ्रेंडली दिवाळीचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 14:06 IST

प्रेक्षकांची आवडती मालिका मन उडु उडु झालंने लोकप्रियतेच शिखर गाठलं आहे.

नुकत्याच सुरु झालेल्या मालिकांमध्ये   प्रेक्षकांची आवडती मालिका मन उडु उडु झालंने लोकप्रियतेच शिखर गाठलं आहे. दिवाळी सणाचा उत्साह सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. मालिकेत देखील हा सण साजरा होताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण सामाजिक भान राखत या मालिकेने एक चांगला संदेश मागील भागात दिला. देशपांडे कुटुंबीय फटाके न फोडता फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी आपण रोप लावायची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे असा संदेश देताना दिसले. दिवाळी म्हंटल कि फटाके आले आणि फटाके म्हणजे प्रदूषण आणि अशुद्ध हवेला निमंत्रणच. 

शुद्ध हवा मिळणं हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. दिवाळी किंवा कुठल्याही प्रसंगी फटाके फोडणे हे घातकच असते. त्यामुळे हवेत खूप प्रदूषण होतं. मालिकेत देशपांडे सर घरी कोरफड, जरबेरा आणि नाग वनस्पती आणतात. हि रोप हवेतील प्रदूषण शोषून घेतात. माणूस म्हणून आपण निसर्गाला काहीतरी देणं लागतो आणि म्हणूनच देशपांडे कुटुंबीय फटाके न फोडता आपल्या घरात ही रोप लावतात. 

प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपण आपल्यापासून केली पाहिजे. त्यामुळे फटाके फोडू नका आणि फटाक्यांमुळे होणार प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी झाडं लावा असा चांगला संदेश मालिकेतून देण्यात आला आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना नेहमी चाहते आणि रसिक प्रेक्षक फॉलो करतात त्यामुळे मालिकेत दिलेला चांगला संदेश सुद्धा ते आचरणात आणतील आणि त्याचसोबत हा संदेश देऊन मालिकेने सुद्धा सामाजिक भान राखून एक बदल घडवून आणण्याची सुरुवात केली असं म्हंटल तर खोट ठरणार नाही.