Join us
Daily Top 2Weekly Top 5

Man Jhala Bajind मालिकेत पाहायला मिळणार धक्कादायक वळण, अखेर गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरणार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 10:53 IST

Man Zal Bajind सोशल मीडियावर राया आणि कृष्णा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंला हार लावलेला दिसत आहे. फोटो पाहून मालिकेच्या पुढील भागात नक्की काय पाहायला मिळणार यावर चर्चा रंगल्या आहेत.

'मन झालं बाजिंद' ( man jhala bajind) मालिका नुकतीच सुरु झाली असली तरी अल्पावधीत मालिकेला रसिकांची भरघोस पसंती मिळाली. मालिकेचे कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे मालिकेला रसिकांच्या पसंतीस उतरली. मालिकेतल्या रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत. दिवसेंदिवस मालिका आता वेगळ्या वळणावर येत आहे. मालिकेत आता धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. रसिकांसाठी हा ट्रॅक पाहणे नक्कीच निराशा करणारा असणार आहे. 

सोशल मीडियावर राया आणि कृष्णा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंला हार लावलेला दिसत आहे.  फोटो पाहून मालिकेच्या पुढील भागात नक्की काय पाहायला मिळणार यावर चर्चा रंगल्या आहेत. गुरुजींनी सांगितलेलं भाकीत अखेर खरं ठरणार आहे असंच या फोटोवरुन स्पष्ट होत आहे. एकीकडे रसिक मालिकेच्या ट्रॅकवर चर्चा करत असताना खिल्ली सुद्धा उडवताना दिसत आहे. 

पुनर्जन्म होईल बहुतेककारण अजून बोर नाही केले ना प्रेक्षकांना पुरते म्हणून परत जन्म घेऊन येतील,अरे आता तर सुरू झाली होती मालिका बंद पण होणार का, कमेंट्स करताना दिसत आहे. मालिकेत आत्तापर्यंत सुरु असलेल्या ट्रॅक रसिकांच्या पसंती उतरत असतानाच आता मध्येच मालिकेत येणारा ट्विस्ट रसिकांना पसंत नसल्याचे दिसतंय. सिरियलचा शेवट चांगला करा.

तसेही गेल्या काही महिन्यात मालिकांना ट्रोल करणे हे काही नवीन राहिले नाही. रसिकांच्या मनोरंजनाच्या नावाखाली  मालिकेचे कथानक नको त्या वळणावर दाखवले जाते. त्यामुळे मालिकेवर रसिक प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसतात. जुन्या मालिकाही त्यांच्या हटके कथानाकामुळे ट्रोल झाल्या परिणामी रसिकांनी त्या मालिकांकडे पाठ फिरवायला सुरुवात केली होती. मालिका बंद झाल्या त्या जागी नवीन मालिका रसिकांच्या भेटीला आल्या. मात्र नवीन मालिकांचीही तशीच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवीन मालिका असल्यातरी तेच ते कथानक असल्याचे पाहायला मिळते.'मन झालं बाजिंद' मालिकेचीही तशीच काहीशी परिस्थिती असल्याचे रसिकांचे म्हणणं आहे.