Join us

'मन झालं बाजींद' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, पतीचे झाले निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 13:48 IST

मन झालं बाजींद या मालिकेत फुई आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्पना सारंग यांच्या पतीचे निधन झाले आहे.

झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत फुई आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्पना सारंग (Kalpana Sarang) यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कल्पना सारंग यांचे पती रमेश जयराम सारंग यांचे १२ मे २०२३ रोजी निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. 

कल्पना सारंग यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या पतीचा फोटो शेअर करत सांगितले की, रमेश जयराम सारंग, भावपूर्ण श्रद्धांजलि १३ जून १९४६- १२ मे २०२३.

कल्पना सारंग यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक कलाकारांनी कमेंटमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. मन झालं बाजींद मालिकेतील वैभव चव्हाणने काळजी घे फुई अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री श्वेता खरातने कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.