मल्हार बनला मानसोपचारतज्ज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:59 IST
कवच - काली शक्तियो से ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेने पहिल्या आठवड्यापासूनच टीआरपी रेसमध्ये ...
मल्हार बनला मानसोपचारतज्ज्ञ
कवच - काली शक्तियो से ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेने पहिल्या आठवड्यापासूनच टीआरपी रेसमध्ये अव्वल क्रमांक पटकवला आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आता एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. कसम या मालिकेत झळकलेला अभिनेता मल्हार पंड्या या मालिकेत एका मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत झळकणार आहे. पारिधीवर उपचार करण्यासाठी तो येणार आहे. मल्हार या मालिकेच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणार असून तो या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे.