Join us

मालगुडी डेज पुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 16:21 IST

 छोटया पडदयावर अनेक मालिका येत असतात. त्यातील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात. अशा या मालिका प्रेक्षक कधीच ...

 छोटया पडदयावर अनेक मालिका येत असतात. त्यातील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात. अशा या मालिका प्रेक्षक कधीच विसरू शकत नाही. त्या मालिकांना बरेच वर्ष झाले असले तरी, त्या मालिका पुन्हा उत्साहाने पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. तसेच आता सोशलमीडियामुळे प्रेक्षकांना संपलेल्या मालिकांचा आनंददेखील घेता येतो. अशीच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटिला येत आहे. ती मालिका म्हणजे मालगुडी डेज. छोट्या पडदयावर  ऐंशीच्या दशकात गाजलेली मालगुडी डेज ही मालिका आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. म्हणूनच या मालिकेच्या खास चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मालगुडी डेज पुन्हा प्रेक्षकांच्या भेटिस येत आहे. दूरदर्शन वाहिनीने त्यांच्या काही जुन्या मालिका पुन्हा प्रदर्शित दाखविण्याचे ठरविले आहे. ऐंशीच्या दशकात छोट्या पडद्यावर गाजलेली मालगुडी डेज ही मालिका आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. प्रसिद्ध लेखक आर.के. नारायण यांच्या कथांवर आधारित, कदाचित आतापर्यंतच्या दूरदर्शनच्या इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध मालिका म्हणजेच मालगुडी डेज. १९८६ मध्ये ही मालिका पहिल्यांदा दूरदर्शनवर आली. आर.के.नारायण लिखित आणि शंकर नाग दिग्दर्शित मालगुडी डेजने त्या काळात समीक्षकांसह सगळ्यांचीच वाहवा मिळवली होती. या मालिकेतील अनेक कथा आजही प्रेक्षकांच्या लख्ख स्मरणात आहेत.  या मालिकेचे मालकीहक्क असणाºया राजश्री या कंपनीने ही संपूर्ण मालिका युट्युबवर टाकण्याचे ठरवले आहे. त्यामुळे रसिकांना पुन्हा एकदा जुन्या काळात जाऊन मालगुडी डेजचा आनंद लुटता येणार आहे. त्यामुळे या मालिकेचे चाहते आनंदित झाले असणार हे नक्की.