Join us
Daily Top 2Weekly Top 5

फटाका आहे मलायका अरोरा, ‘इंडियाज बेस्ट डान्सर' शोमध्ये डोकेदुखी ठरते ही व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 11:22 IST

नुकताच मलायका अरोराचा एक व्हिडीओ समोर आला आहे.व्हायरल झालेला व्हिडीओ ‘इंडियाज बेस्ट डान्सर' शोमधला आहे.

मलायका अरोरा सिनेमात झळकत नसले तरी तिचे लाखोंच्या संख्येत दिवाने आहे. वयाची ४८ व्या वर्षी मलायका दिसायला फार सुंदर दिसते. तिचे सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाजा लावणेही अशक्यच.तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. मात्र कधी कधी चाहत्यांचे अतिप्रेमही तिच्यासाठी डोकेदुखी ठरते. त्यामुळे अनेकदा कुठे जाताना मलायका सावधगिरी बाळगताना दिसते. 

नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे.व्हायरल झालेला व्हिडीओ  ‘इंडियाज बेस्ट डान्सर' शोमधला आहे. मलायका ही ‘इंडियाज बेस्ट डान्सर’शोला जज करत आहे. मनीष पॉल या शोला होस्ट करत आहे. मनीष मलायकाला फ्लर्ट करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतंच या शो चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मनीष पॉल हा मलायकाला सर्वांसमोर फटाका असल्याचे बोलताना पाहायला मिळतोय. मनीषला फ्लर्ट करताना पाहून ‘ अरे याला कोणीतरी बांधून ठेवा ’, असे  मलायका गंमतीत म्हणताना दिसत आहे. व्हिडीओ मजेशीर असून चाहते यावेळी मलायकाचे नाहीतर मनीषचा कॉमेडी अंदाज पाहून हसून हसून लोटपोट होत आहेत. 

मलायका आजही इतकी फिट आणि फाइन कशी ? तर याचे उत्तर आहे तिचे फिटनेसवर असलेले प्रेम. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. 4८ वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते. तुर्तास मलायका हा नवीन वर्कआऊट फोटो इतरांनाही प्रेरणा देईल हे मात्र नक्की. 

टॅग्स :मनीष पॉलमलायका अरोरा