साथिया या मालिकेत छोट्या मीराची भूमिका साकारणारी चिमुकली मॅझस व्यास ही प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मेरी सासू माँ या मालिकेत ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ही मालिका काही दिवसांचा लीप घेणार आहे. मॅझल या मालिकेत बंटीच्या लहान बहिणीची म्हणजेच अर्पिताची भूमिका साकारणार आहे. परी अर्पिताची शिक्षिका म्हणून घरात येणार असून अर्पितामुळेच बंटी आणि परी एकमेकांना भेटणार आहेत.
मॅझल नव्या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 11:54 IST