Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील ‘समीर’च्या खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर,अभिनेत्रींनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 09:00 IST

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील समीर ही भूमिका अभिनेता संकर्षण कर्‍हाडेने साकारली आहे.

गेल्या काही महिन्यात नवीन सुरु झालेल्या मालिकाही रसिकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. अल्पावधीतच मालिकांना रसिकांची पसंती मिळत आहे. या सगळ्यात जास्त  ‘माझी तुझी रेशीमगाठ”ही मालिका रसिकांची आवडती मालिका बनली आहे. मालिकेचा वेगळा विषय रसिकांच्या मनाला भुरळ घालत आहे. सुरुवातीच्या काही भागांपासूनच ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. तर बालकलाकार मायरा वायकूळ म्हणजे परीच्या भूमिकेलाही रसिकांची भरघोस पसंती मिळत आहे. या सगळ्यांमध्ये आणखी एका अभिनेत्याची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. समीर ही भूमिका अभिनेता संकर्षण कर्‍हाडेने साकारली आहे. 

संकर्षणचाही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तो फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. तसेच कुटुंबासह अनेकदा क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतानाचे फोटोही शेअर करत असतो. त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असते. संकर्षणची पत्नीही दिसायला फार सुंदर आहे. संकर्षणच्या पत्नीचे नाव शलाका आहे.आपल्या पत्नीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

 

या दोघांमध्ये फारच सुंदर बॉडिंग आहे. अभिनेत्रींनाही टक्कर देईल इतकी ती सुंदर दिसते.ती लाइमलाईट पासून दूर असते. हे सुंदर जोडपं काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा बनले आहेत.  या कपलला मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव सर्वज्ञ आणि मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे. 

मुलांच्या या हटके नावाचीही चर्चा प्रचंड झाली होती. इतकंच नाही तर त्यानं सर्वज्ञ आणि स्रग्वी या नावांचा अर्थही सांगितला होता. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणनारा , ज्ञानी आणि स्रग्वी म्हणजे पवित्रं तुळस , असा या नावांचा अर्थ आहे.संकर्षण उत्तम अभिनेता असण्यासोबतच उत्तम दिग्दर्शक आणि लेखक देखील आहे.  सध्या संकर्षण समीरच्या रुपात ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून रसिक प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

टॅग्स :श्रेयस तळपदे