Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहा आणि यशचं या ठिकाणी पार पडणार विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 13:07 IST

Majhi Tujhi Reshimagath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. लवकरच मालिकेत नेहा आणि यशचं लग्न पार पडणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimagath) ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांना खूपच भावली आहे. नेहा आणि यशची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते आहे. चिमुकल्या परीने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

मालिकेत सध्या नेहा आणि परी चौधरींच्या पॅलेसमध्ये रहात आहेत. परीच्या पॅलेसमध्ये राहिल्यामुळे चौधरीच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परीमुळे दूर गेलेले चौधरी पुन्हा एकमेकांच्या जवळ आले आहेत. परीमुळे यशच्या दोन्ही काकांमध्ये सुसंवाद निर्माण झाला. परीमुळेच मिथिला काकू आणि विश्वजीत काकामध्येदेखील चांगलं बॉण्डिंग निर्माण होत आहे. हे सर्व पाहून आजोबा परीला दत्तक घ्यायचा निर्णय घेतात. हे करण्यामागे खरेतर सिम्मी काकूंचा डाव होता. आजोबांनी परीला दत्तक घ्यायचे जाहीर केल्यानंतर यश आणि नेहाला धक्का बसतो. त्यावेळी यश आजोबांना सांगतो की, 'तुम्हाला तसं करता येणार नाही. कारण परीचे आई-वडील आहेत. नेहा परीची खरी आई आहे.'

आजोबांना हे सर्व ऐकून धक्का बसतो. मात्र मोठ्या घडामोडींनंतर अखेर आजोबा परीचं सत्य स्वीकारतात. इतकेच नाही तर यश आणि नेहाच्या नात्यालाही परवानगी देतात. त्यामुळे आगामी भागामध्ये यश आणि नेहाचा साखरपुडा आणि लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नेहा आणि यशचं ग्रॅण्ड लग्न पार पडणार आहे. हे लग्न सिल्व्हासा येथे पार पडणार आहे. तसेच मराठी टेलिव्हिजनवरील तुला पाहते रे मालिकेनंतरच या मालिकेतील हे लग्न ग्रॅण्ड वेडिंग ठरणार आहे. नेहा आणि यशचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :झी मराठी