Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रीमान श्रीमती फिर से या मालिकेत हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 15:03 IST

९० च्या दशकातील सुपरहिट विनोदी मालिका ‘श्रीमान श्रीमती’ आता अगदी ताज्या दमाने आणि नव्या अवतारात ‘श्रीमान श्रीमती फिर से’ ...

९० च्या दशकातील सुपरहिट विनोदी मालिका ‘श्रीमान श्रीमती’ आता अगदी ताज्या दमाने आणि नव्या अवतारात ‘श्रीमान श्रीमती फिर से’ नावाने मनोरंजनात्मक शैलीमध्ये परत तीच जादू निर्माण करण्यासाठी सोनी सबवर येत आहे. १९९४ साली ‘श्रीमान श्रीमती’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. त्यावेळी या मालिकेचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजन वागधरे यांनी केले होते. या नव्या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा देखील तेच सांभाळणार आहेत. या मालिकेची कथा तीच राहणार असून मालिकेतील सुप्रसिद्ध पात्रे आयुष्यात एक नवा ताजेपणा घेऊन येणार असून यामध्ये प्रेमा शालिनी ऊर्फ डॉलची भूमिका बरखा बिश्त, दिलरुबा ऊर्फ दिलची भूमिका सुरेश मेनन, केशव कुलकर्णी ऊर्फ केकुची भूमिका समीर शाह आणि कोकीला ऊर्फ कोकीची भूमिका सुचेता खन्ना साकारणार आहेत. १३ मार्च २०१८ रोजी श्रीमान श्रीमती फिर सेचा प्रिमियर असून सोनी सबवर सोमवार ते शुक्रवार रात्री ७.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेप्रमाणेच ‘श्रीमान श्रीमती फिर से’ या मालिकेची कथा देखील दोन शेजाऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणार आहे. दोन्ही घरातील पुरुषांच्या मनात एकमेकांच्या बायकांबद्दल एक हळवा कोपरा असतो आणि त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. त्यांच्या या सततच्या व्यर्थ प्रयत्नांमुळे अतिशय गमतीशीर आणि तितक्याच विचित्र परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे या कथेमध्ये अजूनच मजा येते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या श्रीमान श्रीमती या मालिकेत दिवंगत जतिन कनाकिया (केशव), राकेश बेदी (दिलरुबा), अर्चना पुरण सिंह (प्रेमा) आणि दिवंगत रीमा लागू (कोकी) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. श्रीमान श्रीमतीप्रमाणेच या मालिकेतदेखील केशव कुलकर्णी अतिशय संशयी, भांडण करणारा आणि फ्लर्ट करणारा असून केकू या नावाने प्रसिद्ध आहे. तो त्याच्या शेजारी राहाणाऱ्या अभिनेत्री प्रेमा शालिनीभोवती सतत घुटमळत असतो. त्याची पत्नी अतिशय नम्र, सुसंस्कृत, हुशार गृहिणी आहे. तिच्या याच गुणावर दिलरुबा फिदा आहे तर प्रेमा शालिनी ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून तिचा बोलण्याचा एक वेगळा लहेजा असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. Also Read : बरखा बिष्ट पार्टनर्स या मालिकेत दिसणार या भूमिकेत