Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमोडची जाहिरात केल्यामुळे नेटीझन्सची सटकली, अभिनेत्री होतेय जबरदस्त ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 06:00 IST

कमोडबरोबर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनीही तिच्यावर कमेंट करायला सुरुवात केली.

कलाकार टीव्ही मालिका, जाहिराती, सिनेमा मिळेल त्या प्रकारचे काम करताना दिसतात. प्रचंड लोकप्रिय असतील तर त्यांच्या लोकप्रियतेनुसार त्यांना काम मिळत असते. अनेक कलाकारा वगेवगळ्या गोष्टींचे प्रमोशन करताना दिसतात. अशाच एका टीव्ही अभिनेत्रीनेही एका खास प्रोडक्टचे प्रमोशन केले आणि तिथेच चाहत्यांना तिला ट्रोल करण्याचा मुद्दा मिळाला.

अभिनेत्री माही वीज सध्या चर्चेत आहे. माही वीजला मिळेल ते काम ती करते. काम मिळवण्यासाठी माही सिलेक्टीव्ह नाही. नुकतेच सोशल मीडियावर तिने काही फोटो शेअर केले आहे. 

या फोटोत ती चक्क कमोडची जाहिरात करताना दिसत आहे. कमोडबरोबर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनीही तिच्यावर कमेंट करायला सुरुवात केली.पैशासाठी आता काहीही करणार का ? अशा कमेंट्स तिला आता मिळत आहेत. फोटो शेअर करत तिने कमोड ज्या कंपनीचा आहे त्याचे नावही कॅप्शनमध्ये टाकल्याने ती पेड प्रमोशन करत असल्याचेही चाहत्यांच्या लगेचच लक्षात आले.

याच जाहिरातीमुळे माहीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाच आहे. तर काही चाहत्यांनीही तिचे कौतुक करत तिला सपोर्ट करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. 

अभिनेत्री माही वीज टीव्ही अभिनेता जय भानुशालीची पत्नी आहे.  2011 मध्ये दोघांनी लग्न केले होते. माहीने दोन मुलांना दत्तकही घेतले आहे. याचबरोबर तारा नावाची या कपलला मुलगी आहे. माहीने 'बालिका वधू', 'लागी तुझसे लगन', 'लाल इश्क', 'ससुराल सिमर का' अशा मालिकांमध्येही काम केले आहे.मुलीच्या जन्मानंतर माहीने ब्रेक घेतला होता. आता ती कामाच्या शोधात असून जाहिराती करताना दिसते.