Join us

बिग बॉस मराठी ३ नंतर आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसणार महेश मांजरेकर, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:06 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचा समावेश आहे. प्रेक्षकांसाठी ही लाफ्टर थेरपीच बनली आहे. मोठमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावताहेत. येत्या 11 आणि 12 फेब्रुवारीला हे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी नवी उमेद दिली आहे. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या पसंती  लाभलेल्या पांघरूण या चित्रपटाची टीमने हास्यजत्रेच्या मंचावर आली होती. यानिमित्ताने चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar )आणि मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, अमोल बावडेकर ही मंडळी इथे उपस्थित होती. 

हास्यजत्रेतील स्कीटमध्ये महेश मांजरेकर स्वतः सहभागी झाले.  "मी न चुकता हास्यजत्रेचे सर्व भाग  पाहतो आणि मला हा कार्यक्रम खूप आवडतो;" असं ते या वेळी म्हणाले. त्यांना हास्यजत्रेच्या मंचावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. 

टॅग्स :महेश मांजरेकर