महेश बनला बॅड बॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 15:58 IST
गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपटांमध्ये सकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता महेश ठाकूर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. इश्कबाज या मालिकेत ...
महेश बनला बॅड बॉय
गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपटांमध्ये सकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता महेश ठाकूर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. इश्कबाज या मालिकेत महेश एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कलाकारांने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे हे अतिशय महत्त्वाचे असते असे महेशचे म्हणणे असल्याने त्याने या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारण्याचे ठरवले आहे. या मालिकेत महेशचा लुकही वेगळा असणार आहे. या मालिकेत तो दाढी आणि मिशीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.