Join us

बिग बॉस फेम महेक चहल दिसणार एकता कपूरच्या 'नागिन 5' मध्ये?, अभिनेत्रीने दिले त्यावर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 11:32 IST

महेकने एकता कपूरच्या 2016मध्ये आलेल्या कवच मालिकेमध्ये काम केले होते.

एकता कपूरचा प्यॉपुलर शो बंद होणार आहे यानंतर नागिन 5 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेव्हा पासून नागिन 5 ची घोषणा झाली आहे त्यादिवसापासून यात मुख्य अभिनेत्री कोण असणार याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागिन 5मध्ये महेक चहल दिसणार असल्याची चर्चा होती. महेकने या चर्चा केवळ अफवा असल्याचे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सांगितले आहे. 

महेकने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, मला 'नागिन 5'साठी अप्रोच करण्यात आलेले नाही आणि हा शो मी करत सुद्धा नाही. माहिती नाही या अफवा पसरविण्याचे काम कोण करतेय. जे काही आहे ते खोटे आहे. 

महेकने एकता कपूरच्या 2016मध्ये आलेल्या कवच मालिकेमध्ये काम केले होते. यानंतर ती बिग बॉस5 मध्ये दिसली होती. महेकने सलमान खानच्या 'वॉन्टेड' सिनेमात सुद्धा काम केले आहे.

नागिन 4मध्ये या मालिकेत अभिनेत्री निया शर्मा, विजेंद्र कुमेरिया, सायंतनी घोष आणि जॅसमीन भसीन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'नागिन 3' सारखा नागिन 4 लोकप्रिय झाला नाही.

टॅग्स :एकता कपूरबिग बॉस