Join us
Daily Top 2Weekly Top 5

तारीख अन् वेळ ठरली... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा प्रोमो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 15:10 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा भेटीला येत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा प्रेक्षकांचा आवडता शो. गेली अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.  हास्यजत्रेचे विनोदवीर उत्तम अभिनय आणि विनोदशैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. या शोमधील कलाकारांनी लोकांचं प्रेम मिळवलंय. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कार्यक्रमाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आवडता कार्यक्रम परतत असल्याने चाहते खुश झाले आहेत.

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' येत्या २ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  याचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कॉमेडी क्विन वनिता खरात, इशा, नम्रता, प्रसाद आणि समीर चौगुले यांचे पात्र पाहायला मिळत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "हास्याची गुगली टाकून विनोदांनी क्लीनबोल्ड करायला पुन्हा घेऊन येत आहोत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! पाहूया, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - कॉमेडीची हॅटट्रीक! २ डिसेंबरपासून, सोम.- बुध., रात्री ९.३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय. 

अमेरिकेत होणाऱ्या प्रयोगामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने १९ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबरदरम्यान असा मोठा ब्रेक घेतला होता. या ब्रेकदरम्यान टीव्हीवर  'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे  जुने एपिसोड दाखवण्यात आले. हे जुने एपिसोडही प्रेक्षकांनी आनंदाने पाहिले  आता काही काळ ब्रेक घेऊन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा भेटीला येत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासेलिब्रिटीमराठी अभिनेता