Join us

'हास्यजत्रा'चे सर्वेसर्वा सचिन गोस्वामींच्या बायकोला पाहिलंत का? लग्नाला झाली २८ वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:00 IST

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामींच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का? करतात हे काम (maharashtrachi hasyajatra, sachin goswami)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून अनेक कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचे निर्माते - दिग्दर्शक सचिन गोस्वामी सुद्धा चर्चेत असतात. सचिन गोस्वामींनी आजवर 'फू बाई फू', 'कॉमेडी एक्सप्रेस', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या लेखन - दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सचिन गोस्वामी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतके अपडेट देताना दिसत नाहीत. अशातच सचिन गोस्वामींच्या लग्नाचा फोटो व्हायरल झालाय. 

सचिन गोस्वामींच्या पत्नीला पाहिलंत का?

सचिन गोस्वामींच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात सचिन आणि त्यांची पत्नी पाटावर बसलेले दिसत आहेत. हा फोटो दोघांच्या लग्नाचा आहे. सचिन यांच्या पत्नीचं नाव आहे सविता गोस्वामी. सचिन आणि सविता यांच्या लग्नाला २८ वर्ष झाली. तेव्हा हा फोटो स्वतः सचिन गोस्वामींनी पोस्ट केला होता. सचिन - सविता यांच्या जोडीला लोकांनी भरभरुन प्रेम दिलं.

सचिन गोस्वामींच्या पत्नी काय काम करतात?

सचिन गोस्वामींची पत्नी सविता या Clinical Psychologist आहेत. याशिवाय मुंबईतील टाटा मेमोरीअल हॉस्पिटलमध्ये त्या Psycho-Oncologist म्हणून नियुक्त आहेत. सचिन - सविता यांना एक मुलगाही आहे. या दोघांचा मुलगा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पडद्यामागे काम करतो. सचिन गोस्वामी हे सध्या 'गुलकंद' या सिनेमाच्या तयारीत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ते स्वतः करत असून प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

     
    टॅग्स :मराठीमराठी अभिनेता