Join us
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार फुटांवरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं स्कायडायव्हिंग, फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 17:03 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने केलं स्कायडायव्हिंग, फोटो व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. हास्यजत्रेतील विनोदवीर अफलातून विनोदांनी प्रेक्षकांना हसवतात. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो. दत्तू मोरे, शिवाली परब, गौरव मोरे, निखिल बने या कलाकारांनाही हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. हास्यजत्रेमुळेच गुणी अभिनेत्री ईशा डेलाही लोकप्रियता मिळाली. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत ईशा प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते.

ईशा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करताना दिसते. सध्या ईशा दक्षिण आफ्रिकेमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. आफ्रिकेत तिने तब्बल १४ हजार फुटांवरुन स्कायडायव्हिंग केलं आहे. ईशाने स्कायडायव्हिंगचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोला तिने “मी हे केलं...१४ हजार फूट खूप उंच वाटतंय का?” असं कॅप्शन ईशाने दिलं आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

“...म्हणून कोणी मत देत नाही”, अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट

“राजकारण्याच्या मुलाबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होते”, शर्लिन चोप्राचा खुलासा, म्हणाली, “तो सेक्ससाठी...”

दरम्यान, ईशाने ‘लंडन स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. कॉलेज जीवनापासून तिने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. अभिनेत्रीबरोबरच ईशा उत्तम डान्सरही आहे. ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमध्येही ईशा झळकली होती.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेता