Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर हर महादेव म्हणत सौरभ चौघुलेनं दाखवली महाकुंभमेळ्याची झलक, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:04 IST

सौरभ अत्यंत भक्तीभावाने तो महाकुंभमेळ्यात सहभागी झाला.

Maha Kumbh Mela 2025: प्रयागराजमध्ये १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १३ जानेवारी २०२५ पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा. कुंभमेळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साधूंपासून सामान्य माणसं ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक व्यक्ती महाकुंभमेळ्यात (Mahakumbhmela) हजेरी लावत आहेत. मराठी अभिनेता सौरभ चौघुलेदेखील (Saorabh Choughule In Prayagraj) कुंभमेळ्यात सहभागी झाला. 

सौरभ चौघुले हा कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला गेला. तेथील एक व्हिडीओ त्यानं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. अभिनत्यानं याआधी गंगास्नानाचे काही फोटोही शेअर केले होते. "काशीचे घाट, जिथे प्रत्येक लहरीत एक कथा दडलेली आहे. हर हर गंगे, हर हर महादेव!!" असं कॅप्शन त्यानं दिलं होतं.  सौरभ अत्यंत भक्तीभावाने महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. सौरभचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या या महाकुंभमेळ्याचा योग १४४ वर्षांनी जुळून आला आहे. कुंभमेळ्यात स्नान करण्याची संधी मिळणे भाग्याचे समजले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील महाकुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. ५ फेब्रुवारीला ते गंगास्नान करणार आहेत. हा महाकुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या कुंभमेळ्याचा अनुभव घ्यावा अशी इच्छा अनेकांची असते. सौरभ चौघुलेची हीच इच्छा पूर्ण झाली आणि त्याला महाकुंभमेळ्याचा अनुभव घेता आला आहे. 

महाकुंभमेळ्यात बिझनेसपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण सहभागी होत आहेत.  बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर, अभिनेत्री भाग्यश्री यांनीही महाकुंभमेळ्याला हजेरी लावली. येत्या काही दिवसांमध्ये अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, आलिया भट, रणबीर कपूर, अनुप जलोटा, रेणुका शहाणे, आशुतोष राणा हे कलाकार महाकुंभमेळ्याला हजेरी लावणार आहेत.

टॅग्स :कुंभ मेळामराठी अभिनेताटिव्ही कलाकार