Join us

वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवणारी ‘महाकाली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 16:03 IST

जेव्हा जेव्हा पृथ्वीतलावर वाईट प्रवृत्तींचा प्रभाव वाढला, तेव्हा तेव्हा त्या अंध:कारातून प्रकाशाचा मार्ग दाखवणारी, वाईटावर विजय मिळवणारी एक अनोखी ...

जेव्हा जेव्हा पृथ्वीतलावर वाईट प्रवृत्तींचा प्रभाव वाढला, तेव्हा तेव्हा त्या अंध:कारातून प्रकाशाचा मार्ग दाखवणारी, वाईटावर विजय मिळवणारी एक अनोखी शक्ती प्रकट झाली. पण, एक वेळ अशीही आली होती की, जेव्हा या अंध:काराला नष्ट करणारी ही शक्तीही असफल ठरत होती. तेव्हा या पृथ्वीतलावर मृत्यू आणि अंध:काराची देवी प्रकट झाली. या शक्तीने वाईट प्रवृत्तींचा सर्वनाश केला. हा होता माँ पार्वतीचा रौद्र अवतार, महाकाली. महाकालीचे नाव ऐकताच आपल्या मनात राग, कपाळावरील माळा, त्रिशुल, प्रलय आणि रक्तरंजित धारा असे चित्र उभे राहते. दयाळू माँ पार्वतीने निर्दयी महाकालीचा अवतार का धारण केला? या तिच्या रूपांतरणामुळे माँ पार्वती का स्वत:च्या अस्तित्वासोबत झगडत होती? असुरांच्या अत्याचाराला पाहून मनोमन भगवान शिव का प्रसन्न होत होते? अशा एक ना अनेक प्रश्नांचे उत्तर देईल ही कथा ‘महाकाली - अंत ही आरंभ हैं’. असूर सम्राट शुंभ माँ पार्वतीच्या सुंदरतेवर मोहित झाला. त्याने त्याचा दूत सुग्रीव्हकडून पार्वतीला आसुरलोक येण्याचे आमंत्रण दिले. पार्वतीला आसुरलोक जायचे नसतानाही असुरांनी देवलोकात येऊन अत्याचार करायला सुरूवात केली. सगळीकडे हैदोस मांडला. या संकटसमयी पार्वती विचलित झाली. विचलित होऊन तिने ‘महाकाली’चा अवतार धारण केला. या अवतारात तिने शुंभ-निशुंभ, चंड-मुंड यासारख्या असुरांचा वध केला. त्यांच्या रक्ताने आपली तृष्णा भागवली. पापाचा सर्वनाश करणे हे एवढेच एक महाकालीचे उद्देश आहे. या उद्देशामागे असलेली प्रेरणात्मक धारणा- ‘जेव्हा पापाचा अंत होईल, तेव्हाच नवा आरंभ होईल. भगवान शिव यांनीच पार्वतीला तिच्यामधील दैवी शक्तींची जाणीव करून दिली. त्यानंतरच तिने महाकालीचा अवतार धारण केला. इतर कथांमधून नेहमीच भगवान शिव यांचा रौद्र अवतारांचं दर्शन घडवलं आहे. मात्र, या कथेत महाकालीचे रूप एवढं भयंकर असेल की, तुम्ही भगवान शिव यांनाही शांत आणि स्थिर समजाल.सध्याच्या स्त्रिया या पूर्णपणे सशक्त आणि सजग आहेत. पण, कुठेतरी त्या देखील त्यांच्या शक्तींपासून अनभिज्ञ आहेत. जोपर्यंत त्यांच्याविरूद्ध अत्याचाराचा घडा भरत नाही तोपर्यंत त्यांना स्वत:च्या क्षमता आणि शक्ती यांची जाणीव होणारच नाही. महाकालीच्या या कथेच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. टेलिव्हिजनच्या दुनियेत ‘महाकाली-अंत ही आरंभ हैं’ ही मालिका माँ कालीच्या अनेक पैलूंचे दर्शन तुम्हाला घडवेल.  माँ पार्वतीचा महाकाली बनण्याचा विनाशकारी प्रवास जरूर पाहा. ‘महाकाली-अंत ही आरंभ है’, आजपासून कलर्स वाहिनीवर दर शनिवार आणि रविवार, सायंकाळी ७ वाजता पाहायला विसरू नका.