Join us
Daily Top 2Weekly Top 5

डान्स दिवाने कार्यक्रमात माधुरी दीक्षितने गायले लग जा गले हे गाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:19 IST

गोल्ड या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मौनी रॉय आणि अक्षय कुमार कलर्सच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने मध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत.

डान्स दिवाने या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे नृत्य प्रेक्षकांना भावत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करायला येतात. या आठवड्याला प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि मौनी रॉय यांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत.

गोल्ड या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मौनी रॉय आणि अक्षय कुमार कलर्सच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने मध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. गोल्ड हा चित्रपट खेळावर आधारित असून या चित्रपटाची कथा ही खूपच रंजक आहे. या चित्रपटातील अक्षय आणि मौनीचा लूक देखील खूप वेगळा आहे.

डान्स दिवाने या कार्यक्रमाच्या सेटवर आल्यानंतर मौनी खूपच खूश झाली होती. कारण ती या कार्यक्रमाची परीक्षक माधुरी दीक्षितची खूप मोठी फॅन आहे. मौनी कार्यक्रमात आल्यापासून केवळ माधुरीलाच पाहात होती. माधुरीच्या सौंदर्यावर ती फिदा झाली होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.  डान्स दिवाने या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे परफॉर्मन्स अक्षय आणि मौनीला खूपच आवडले. सिझा आणि किशनच्या लग जा गले या गाण्यावरील परफॉर्मन्स नंतर तर त्या दोघांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. हा परफॉर्मन्स सुरू असताना माधुरी हे गाणे गुणगुणणत होती हे पाहून मौनीने तिला हे गाणे गाण्याची विनंती केली आणि माधुरीने ती मान्य केली. माधुरीच्या गायनाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते आणि तिच्या टॅलेंटने भारावून गेले होते. 

स्पर्धकांचे परफॉर्मन्स चालू असताना माधुरी नेहमीच गुणगुणताना दिसते. पण यावेळी जेव्हा मौनीने गाण्याची विनंती केली तेव्हा तिच्या मधुर आवाजावर सर्वजण मोहित झाले होते. माधुरी दीक्षितचे गाणे ऐकण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे मौनी खूपच खूश झाली होती. 

डान्स दिवानेचा हा भाग प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळणार असून हा भाग सगळ्यांना आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षितअक्षय कुमार