Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डान्‍स दिवाने'च्‍या अत्‍यंत खास एपिसोडमध्‍ये माधुरी दिक्षित स्‍पर्धकांसोबत धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 14:55 IST

'डान्‍स दिवाने'चे सर्व स्‍पर्धक मंचावर पियुष आणि परीक्षकांसोबत सामील झाले आणि त्‍यांनी मंचावर वेगळाच उत्‍साह निर्माण केला.

कलर्सवरील शो 'डान्‍स दिवाने'मध्‍ये स्‍पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्‍सेस पाहायला मिळत आहेत. तडफदार, आकर्षक व उत्‍साहपूर्ण परफॉर्मन्स सादर करणा-या प्रत्‍येक स्‍पर्धकाचे अनेक चाहते बनले आहेत. पण आगामी एपिसोडमध्‍ये डान्‍स दिवा माधुरी दिक्षित घायाळ करणा-या नृत्‍यासह मंचावर रोमांच निर्माण करणार आहेत. कोणत्याही स्‍पर्धकाने माधुरी यांना त्‍यांच्‍यासोबत नृत्‍य करायला विचारल्‍यानंतर त्‍यांनी ते उत्‍स्‍फूर्तपणे मान्‍य केले आणि त्‍यांच्‍यासोबत नृत्‍य देखील केले.

पियुषने प्रथम माधुरीला नृत्‍य करण्‍यासाठी विनंती केली आणि तिनेही त्‍याच्‍या प्रेमळ विनंतीला नकार न देता चित्रपट 'देवदास'मधील 'छलक छलक' गाण्‍यावरील अत्‍यंत खास परफॉर्मन्ससाठी मंचावर त्‍याच्‍यासोबत अवतरली. माधुरीसोबत सह-परीक्षक धर्मेश येलांडे आणि तुषार कलिया हे देखील सामील झाले आणि धमाकेदार परफॉर्मन्‍स दिला. शेवटी, 'डान्‍स दिवाने'चे सर्व स्‍पर्धक मंचावर पियुष आणि परीक्षकांसोबत सामील झाले आणि त्‍यांनी मंचावर वेगळाच उत्‍साह निर्माण केला.

लाखो हृदयांची राणी माधुरी यांनी हिप हॉपची राणी गुंजनसोबत देखील नृत्‍य केले. गुंजनच्‍या नृत्‍यकौशल्‍याची सर्वांनी भरभरून प्रशंसा केली आहे. निश्चितच 'डान्‍स दिवाने'साठी हा धमाकेदार सप्‍ताह ठरला आहे, जेथे स्‍पर्धकांचे उल्‍लेखनीय परफॉर्मन्स पाहायला मिळण्‍यासोबत लोकप्रिय परीक्षक माधुरी दिक्षितचे नृत्‍यकौशल्‍य देखील पाहायला मिळाले. 

टॅग्स :माधुरी दिक्षित