Join us

'या' व्यक्तीच्या आठवणीमुळे माधुरी दीक्षितच्या डोळ्यात आले अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 10:17 IST

कलर्सचा नवीन रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने'ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या शोच्या परीक्षकांची जबाबदारी माधुरी दीक्षित नेने, शशांक खेतान आणि तुषार कालिया संभाळतायेत.

ठळक मुद्देलवकरच माधुरी आपल्याला अनिल कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

कलर्सचा नवीन रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने'ला  प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. हा शो वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामध्ये संपूर्ण भारतातील 3 पिढ्यातील लोक स्पर्धक म्हणून येणार आहेत आणि डान्स सादर करणार आहेत. या शोच्या परीक्षकांची जबाबदारी माधुरी दीक्षित नेने, शशांक खेतान आणि तुषार कालिया संभाळतायेत.

आगामी एपिसोडचे शूटिंग चालू असताना माधुरी दीक्षित भावूक झाली आपल्या वडिलांच्या जुन्या आठवणी उजाळा देत असताना. या अभिनेत्रीने तिच्या वडिलांशी तिचे असलेले विशेष नात्याचा उलगडा केला. माधुरीच्या वडिलांना त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी पासून ऐकू येणे बंद झाले. तरीही तिच्या वडिलांनी कंपनाद्वारे संगीत समजून घेतले. त्यामुळे तिच्या जीवनावर सुध्दा संगीत आणि डान्सचा फार मोठा प्रभाव पडला आहे.

लवकरच माधुरी आपल्याला अनिल कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. दिग्दर्शक इंदर कुमारचा चित्रपट 'टोटल धमाल'मध्ये माधुरी आणि अनिल झळकणार आहेत. टोटल धमालमध्ये माधुरी आणि अनिल कपूर दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल कपूर यात अविनाश नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. माधुरी आणि अनिल कपूरच्या जोडीने आतापर्यंत खेल, बेटा, तेजाब सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे. ‘टोटल धमाल’ हा चित्रपट ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा चित्रपट ‘डबल धमाल’ होता.‘टोटल धमाल’ ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, ‘धमाल’च्या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तुफान कॉमेडी बघावयास मिळाली. 

टॅग्स :माधुरी दिक्षित