Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डान्‍स दिवाने'शोच्या मंचावर माधुरी दिक्षित आणि जावेद जाफ्री एक दशकानंतर आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 06:00 IST

माधुरी दीक्षित आणि जावेद जाफरी ९०च्‍या दशकातील त्‍यांचा चित्रपट '१०० डेज'मधील लोकप्रिय गाण्‍यावर नृत्‍य करताना दोघेही जुन्‍या आठवणींमध्‍ये रममाण झाले. 

छोट्या पडद्यावरील शो 'डान्‍स दिवाने'चा सध्‍याचा सीझन उत्‍साहामध्‍ये असताना डान्‍स अॅक्‍शन अधिकाधिक उत्तम होत आहे. स्‍पर्धकांनी त्‍यांचे पॉवर-पॅक परफॉर्मन्‍स, अविरत प्रतिभांसह सर्वांना मंत्रमुग्‍ध केले आहे. दर आठवड्याला त्‍यांची नृत्‍याप्रती दिवानगी पाहिल्‍यानंतर परीक्षक व अतिथी देखील थिरकण्‍यापासून स्‍वत:ला रोखू शकले नाही.यावेळी माधुरी दिक्षित यांनी जावेद जाफरीसोबत नृत्‍य केले आणि परफॉर्मन्‍स अद्भुत होता.

काही वर्षांपूर्वी दोघांनी एकत्र नृत्‍य केले आहे आणि अनेक वर्षांनंतर ९०च्‍या दशकातील त्‍यांचा चित्रपट '१०० डेज'मधील लोकप्रिय गाण्‍यावर नृत्‍य करताना दोघेही जुन्‍या आठवणींमध्‍ये रममाण झाले. त्‍यांच्‍या परफॉर्मन्‍ससोबत प्रेक्षकांना टॉप ८ ला तगडे आव्‍हान देण्‍यासाठी 'डान्‍स दिवाने'मध्‍ये प्रवेश केलेल्‍या वाइल्‍ड कार्ड एण्‍ट्री स्‍पर्धकांचे काही अद्भुत क्षण देखील पाहायला मिळाले. 

जावेद जाफरी अभिनयासह उत्तम नृत्यही सादर करतो. ‘मेरी जंग’ या पहिल्या चित्रपटातून याची प्रचिती रसिकांना आली होती.  त्याने ‘बोल बेबी बोल’ या गाण्यावर केलेले नृत्य आजही चाहत्यांच्या लक्षात असेल. त्याच्या या गाण्याने आणि नृत्यशैलीने अवघ्या तरुणाईला थिरकायला भाग पाडले होते. इंडस्ट्रीत मोठ्या मेहनतीने  जावेद जाफरीने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

अभिनयातून मनं जिकणरा जावेद जाफरी केवळ अभिनेता आणि डान्सरच नाही तर, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील काम करतो. एक उत्तम डिबिग आर्टीस्ट तो आहे.  त्याने मिकी माऊ ते गूफीपर्यंत अनेक कार्टूनसाठी आवाज डब केले आहेत. ‘ताकेशीस कास्टल’ या त्याच्या कार्यक्रमाचे चाहते तर जगभरात आहेत.

टॅग्स :माधुरी दिक्षितजावेद जाफरी