Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधवी निमकरचा हनीमून लूक होतोय व्हायरल, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 11:34 IST

माधवी निमकरने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं. यातही तिने 'अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलीकडे' या मालिकांमध्ये काम केलं. तर 'संघर्ष', 'नवरा माझा भवरा', 'सगळं करून भागलं', 'धावाधाव', 'बायकोच्या नकळत' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.

छोट्या पडद्यावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका रसिकांचं धम्माल मनोरंजन करत आहे. मालिकेचं कथानकही रसिकांना चांगलंच भावतंय. शिवाय मालिकेतल्या कलाकारांचा अभिनयही रसिकांच्या मनात घर करुन गेलाय. या कलाकारांपैकी एक असणाऱ्या अभिनेत्री माधवी निमकर हिनेही रसिकांची मने जिंकलीत.

 

 

 

या मालिकेत माधवीने साकारलेली भूमिकेाही रसिकांच्या मनात घर करुन गेली आहे. माधवीचा शूटिंग सेटवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. .या व्हिडीओत शूटिंग आटोपून मेकअप रुममध्ये मेकअप काढताना दागदागिणे उतरवताना दिसत आहे. यावेळी माधवीने शॉर्ट्स आणि टीशर्ट घातल्याचे पाहायला मिळतंय. यावर टिकली आणि हिरव्या बांगड्या हातात घातल्याचे पाहायला मिळतंय. 

शूटिंगसाठी केलेला मेकअप आणि दागिणे काढताना टीम मेंबरसोबत गप्पा मारताना माधवीला तिचा लूक पाहून हनीमूनला गेल्यासारखे वाटतंय. कारण नवीन लग्नानंतर हनीमूनला जाताना अशाच प्रकारचे वेस्टर्न ड्रेसिंग करणे सगळ्यांनाच आवडते. वेस्टर्न ड्रेसमध्ये टिकली आणि बांगड्या घातल्याचे पाहायला मिळते. अगदी तशाप्रकारचे माझा लूक दिसत असून हनीमूनचीच आठवण झाल्याचे माधवी सांगते. निवांत वेळेत शूट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

रिल असो किंवा रिअल माधवीचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो. रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही माधवी तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. समोर आलेल्या व्हिडीओत माधवी खूप सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य पाहून सारेच फिदा होतात. माधवीला फिटनेसचेही वेड आहे. खऱ्या आयुष्यात प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. फिट राहण्यासाठी माधवी नियमित योगा करते. माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.अनेक वर्षांपासून माधवी नियमितपणे योगाभ्यास करत आहे. अवघड आणि तेवढीच भन्नाट असणारी योगासनं ती अगदी सहज करतेय. 

 माधवीने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं. यातही तिने 'अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलीकडे' या मालिकांमध्ये काम केलं. तर 'संघर्ष', 'नवरा माझा भवरा', 'सगळं करून भागलं', 'धावाधाव', 'बायकोच्या नकळत' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.