Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅडम सर’ मालिकेने गाठला ६०० भागांचा टप्पा, टीमनं केलं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:14 IST

सोनी सबवरील ‘मॅडम सर’मालिकेनं नुकतेच ६०० एपिसोड्सचा टप्‍पा गाठला आहे.

 पोलीस, गुप्तहेर अशा भूमिका आता महिला कलाकार देखील ताकदीने आणि कौशल्याने साकारतात. प्रेक्षकांची मनं जिंकून व टेलिव्हिजन स्‍क्रिन गाजवणारी अशीच एक मालिका म्हणजे सोनी सबवरील ‘मॅडम सर’. मालिकेनं नुकतेच ६०० एपिसोड्सचा टप्‍पा गाठला आहे. 

हि मालिका म्हणजे ऍक्शन, ड्रामा आणि मनोरंजनाचा धमाका आहे. सामाजिक संदेश देणा-या विनोदी कॉप-ड्रामा असलेल्या या मालिकेमध्‍ये एसएचओ हसीना मलिकच्‍या भूमिकेत गुल्‍की जोशी, करिष्‍मा सिंगच्‍या भूमिकेत युक्‍ती कपूर, संतोषच्‍या भूमिकेत भाविका शर्मा आणि पुष्पाजीच्‍या भूमिकेत सोनाली नाईक हे कलाकार आहेत. 

हे यश साजरं करताना गुल्‍की जोशी म्‍हणाली,‘’संपूर्ण टीमला स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे वाटत आहे. प्रेक्षक नेहमी आमच्‍यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. संपूर्ण टीमच्या प्रयत्‍नांचे फळ मिळाले पाहून खूप छान वाटतंय आणि आम्‍हाला एकमेकांचा खूप अभिमान वाटतोय.’’

युक्‍ती कपूर म्‍हणाली, ‘’असे वाटते की, आम्‍ही कालच ५०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण केला आणि क्षणात आम्‍ही या टप्‍प्‍यापर्यंत पोहोचलो आहेात. आमच्‍यावर प्रेमाचा वर्षाव करणा-या चाहत्‍यांचे जितके आभार मानू ते कमीच आहे. मला व संपूर्ण टीमला या संपूर्ण प्रवासामध्‍ये भरपूर काही शिकायला मिळाले आहे. निश्चितच प्रेक्षकांचा पाठिंबा आमच्‍यासाठी महत्त्वाचा आहे.’’ 

टॅग्स :सोनी सबसेलिब्रिटी