लिनेशचे सिक्स पॅक्स अॅब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 14:34 IST
सलमान खान, हृतिक रोशन, जॉन अब्राहम यांसारख्या अभिनेत्यांचे सिक्स पॅक्स अॅक्स आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात. आता मालिकेतल्या कलाकरांचाही सिक्स ...
लिनेशचे सिक्स पॅक्स अॅब
सलमान खान, हृतिक रोशन, जॉन अब्राहम यांसारख्या अभिनेत्यांचे सिक्स पॅक्स अॅक्स आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात. आता मालिकेतल्या कलाकरांचाही सिक्स पॅक्स अॅब बनवण्याकडे कल वाढू लागला आहे. इश्कबाज या आगामी मालिकेत प्रमुख अभिनेता साकारणारा अभिनेता लिनेश मट्टू प्रेक्षकांना सिक्स पॅक्स अॅब्समध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचे सिक्स पॅक्स दिसण्यासाठी या मालिकेच्या प्रोमोमध्ये तो शर्टशिवाय दिसणार आहे. हा प्रोमो चित्रीत करताना लिनेश खूपच लाजत असल्याचे त्याच्या टीममधील मंडळी सांगतात.