Join us

‘अभिनय एन्जॉय करायला आवडतं’ - स्तवन शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 17:42 IST

अबोली कुलकर्णी अभिनेता स्तवन शिंदे म्हणजे मराठी मालिका, चित्रपटांचा नवा चॉकलेट बॉय. ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मराठी ...

अबोली कुलकर्णी अभिनेता स्तवन शिंदे म्हणजे मराठी मालिका, चित्रपटांचा नवा चॉकलेट बॉय. ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मराठी मालिकेनंतर आता स्तवन ‘दिल ढुंढता हैं’ या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या आणि एकंदरितच प्रवासाविषयी त्याच्यासोबत मारलेल्या या दिलखुलास गप्पा...*  ‘विशी’ या कॅरेक्टरविषयी काय सांगशील?- आत्तापर्यंत वेगवेगळया भूमिका साकारल्या. मात्र, ‘विशी’ ही भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी आहे. विशी हा एक खूप प्रेमळ, समंजस आणि मनमिळाऊ मुलगा आहे. त्याचं घरच्यांवर खूप प्रेम आहे. घरातील प्रत्येक सदस्यासोबत तो तेवढ्याच आत्मियतेने आणि प्रेमाने वागतो. आता तर त्याचं लग्नही झालंय. त्याची पत्नी रावी आणि त्याची आई यांच्यात बाँडिंग निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत असतो. कारण रावी ही पंजाबी मुलगी आहे. स्तवनलाही विशीकडून बरंच काही शिकायला मिळालंय.*  शिव्या पठानिया (रावी) सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?-  आम्ही जेव्हा मालिकेच्या मॉक शूटसाठी भेटलो. तेव्हा आम्ही असं काही परफॉर्म केलं की, आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत आहोत, एकमेकांसोबत काम केलं आहे. आमच्यातील ट्यूनिंग, बाँडिंग पाहून सेटवर सर्वांनाच आमच्यातील केमिस्ट्री चांगली जमणार याचा अंदाज आला होता. खरंतर सेटवर ती खूपच मनमिळाऊ, हेल्पिंग नेचरची आहे. ती माझी एक चांगली मैत्रिण देखील झाली आहे. * ‘दिल ढुंढता हैं’ या मालिकेचा यूएसपी काय सांगशील?- खरं सांगायचं तर, मालिकेचा यूएसपी साधेपणा आहे. मालिकेत जे कुटुंब दाखवण्यात आले आहे ते खूपच साधे आहे. बºयाच वेळा असं होतं की, तुमच्याही आयुष्यात असे काही छोटे छोटे क्षण असतात मात्र, ते आपण आनंदाने अनुभवत नाही. हेच काही क्षण आम्ही मालिकेच्या निमित्ताने जतन करून प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.*  तू एक ट्रेन्ड डान्सर आहेस. तर तुझ्यासाठी डान्स आणि अ‍ॅक्टिंग या दोन माध्यमांपैकी कोणते माध्यम जास्त कम्फर्टेबल वाटते?- मी माझ्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात डान्स करायला सुरूवात केली होती. मी कला क्षेत्राची एवढी आवड नव्हती. मात्र, हळूहळू मी अभिनय करू लागलो तेव्हा डान्स मागे सुटत गेला. आता मी माझा अभिनय एन्जॉय करतो आहे, शिकतो आहे.*  तू मराठी मालिकेतही काम केले आहेस. तर तुला दोन्ही भाषांमधील वर्क कल्चरचा काय फरक जाणवला?- मराठी मालिकेत काम करताना मला भाषेचा अडथळा येत नाही. मात्र, हिंदी मालिकेत काम करताना केवळ अभिनयाकडे थोडेसे लक्ष द्यावे लागते. वर्क कल्चरचा तसा फार फरक नाही. दोन्हींकडे अभिनयच करावा लागतो. *  सध्या वेबसीरिजचा ट्रेंड सुरू असून एखाद्या वेबसीरिजची आॅफर आल्यास तुला काम करायला आवडेल का?- नक्कीच आवडेल. नवनवीन आव्हानं स्विकारायला मला आवडतं. वेबसीरिज हे आता नवं माध्यम असून मला एखाद्या वेबसीरिजची आॅफर आली तर मी नक्की करेन.