Join us
Daily Top 2Weekly Top 5

"राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधा अडकणार का दिपीकाच्या जाळ्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 12:42 IST

'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये राधाचा कान आता बरा झाला असून ती प्रेम अजूनही राधाच्याच माहेरी रहात आहे.राधाला मनविण्यासाठी. ...

'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये राधाचा कान आता बरा झाला असून ती प्रेम अजूनही राधाच्याच माहेरी रहात आहे.राधाला मनविण्यासाठी. प्रेमचे राधा प्रती वागणे पूर्णपणे बदलले असून तो राधाची काळजी करु लागला आहे आणि हे आपल्या नात्यासाठी धोकादायक असल्याची भावना दिपीकाच्या मनामध्ये घर करून बसली आहे. येत्या होळी आणि रंगपंचमीच्या आठवड्यामध्ये दीपिका एक नवी खेळी खेळणार आहे ज्यामध्ये प्रेम आणि राधा अडकेल का ? प्रेमला दिपिकाचे सत्य कळेल का ? हे बघणे रंजक असणार आहे.या वर्षीची होळी निंबाळकरांच्या परिवारामध्ये जोश्यात साजरी होणार आहे कारण राधा- प्रेम तसेच अन्विता-आदित्य यांची लग्नानंतरची ही पहिलीच होळी आहे. या होळी सेलिब्रेशनसाठी सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमा मधील प्रेक्षकांचे लाडके प्रेसेनजीत कोसंबी आणि विश्वजित बोरवणकर निंबाळकरांच्या घरी रंगपंचमी साजरी करायला जाणार आहेत. ज्यामध्ये हे दोघे त्यांची ये ग ये ये मैना, देखा ना हाय रे आणि प्रीतीचा विंचू ही दमदार गाणीदेखील सादर करणार आहेत. तेंव्हा राधा प्रेम रंगी रंगलीचा हा होळी आणि रंगपंचमी विशेष भाग रंजक असणार आहे यात शंका नाही. या सगळ्या आनंदमयी वातावरणामध्ये दिपिका आपले कारस्थान रचणार आहे ज्यामध्ये ती प्रेम आणि राधाला ती गरोदर असल्याचे सांगणार आहे. परंतु तिने राधाला हे सांगितलेले नाही कि ही गोष्ट प्रेमला माहिती आहे ईतकेच नसून ती राधाला धमकी देखील देते कि तिने हि गोष्ट प्रेमला सांगू नये.आता प्रेमला दिपिकाचे हे कारस्थान कळल्यावर तो काय करेल ? हे बघणे रंजक असणार आहे.  'राधा प्रेम रंगी रंगली'मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत ज्यामुळे मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. काही दिवसांपूर्वी प्रेमच्या हातून घडलेल्या एका चुकीची शिक्षा राधाला भोगावी लागली.याच घटनेपासून मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. ज्यामध्ये अनेक निरुत्तरित प्रश्न आहेत,ज्याची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.राधा परत सासरी येणार का ? दीपिका तिच्या आणि प्रेमच्या लग्नाचे सत्य कळणार का? राधाच्या पत्रिकेतील दोषामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होणार का? माधुरीची या सगळ्यावर काय प्रतिक्रया असेल? देशमुखांची संपूर्ण संपत्ती राधाच्या नावावर झालेली आहे हे कळल्यावर प्रेम काय करेल ? या सगळ्यामध्ये प्रेमला राधा प्रती आणि तिच्या कुटुंबाविषयी वाटणारी जबाबदारी तो कसा पूर्ण करेल? या सगळ्या गोष्टींचाही उलगडा होणार आहे.