Join us

उर्मिलाला आता मी जितका वेळ देईल, तितका तो कमीच ः आदिनाथ कोठारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 17:25 IST

जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया या मालिकेच्या यशानंतर कोठारे व्हिजन विठू-माऊली ही पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. ...

जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया या मालिकेच्या यशानंतर कोठारे व्हिजन विठू-माऊली ही पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या मालिकेबाबत या मालिकेचा निर्माता आदिनाथ कोठारेसोबत मारलेल्या गप्पा...विठ्ठल या दैवताच्या आयुष्यावर आधारित मालिका बनवण्याचे का ठरवले?विठ्ठल हे आपले आराध्य दैवत आहे. विठ्ठलाचे अनेक भक्त असून पंढरपूर या देवस्थानी जाऊन नतमस्तक होतात. विठ्ठल हे कोणत्याही ठरावीक जाती-धर्माचे दैवत मानले जात नाही. सगळ्या जाती-धर्माचे लोक वारीला आवर्जून जातात. हे दैवत माणुसकीचे दैवत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे विठ्ठलाची गाथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या मालिकेद्वारे प्रयत्न करणार आहोत. या मालिकेसाठी आम्ही कित्येक महिन्यांपासून संशोधन करत आहोत. अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन आम्ही या मालिकेसाठी घेतले आहे. आळंदी, पंढरपूर येथे आम्ही या मालिकेसाठी अनेकवेळा जाऊन आलो आहोत. या मालिकेत विठ्ठलाच्या भूमिकेत असलेल्या कलाकाराची निवड कशी केली?विठ्ठलाची प्रतिमा लोकांच्या मनात घर करून बसलेली आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी चांगला कलाकार शोधणे हे आमच्यासाठी एक खूप मोठे आवाहन होते. कित्येक महिने आम्ही या भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात होतो. अनेक ऑडिशन घेतल्यानंतरही कोणताही कलाकार या भूमिकेसाठी आम्हाला योग्य वाटत नव्हता. पण अजिंक्य राऊतला पाहिल्यावर हाच आमचा विठ्ठल असल्याची आम्हा सगळ्यांची खात्री पटली. या मालिकेचा प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीस आला असून प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत.या मालिकेच्या शीर्षकगीतावर देखील तुझ्या टीमने खूप मेहनत केली आहे, त्याविषयी काय सांगशील?विठू माऊलीचे शीर्षकगीत आदर्श शिंदेने गायले असून गुलराज सिंहने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. गुलराज सिंहने बरीच वर्षं ऑस्कर विजेत्या ए. आर. रहमान आणि शंकर एहसान लॉय यांच्यासारख्या दिग्गजांसाठी कीबोर्ड वाजवले आहे आणि संगीत निर्मिती केली आहे. विठूमाऊलीच्या शीर्षक गीताद्वारे त्यांनी मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे. या शीर्षक गीतावर या सगळ्यांनी खूपच मेहनत घेतली आहे. तुझ्या आणि उर्मिलाच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार आहे. त्याच्या आगमनाची तयारी कशी सुरू आहे?आमच्या आयुष्यात एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. त्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. यंदाची दिवाळी तर आमच्यासाठी खूप स्पेशल होती. मालिकेची तयारी करण्यासोबतच नव्या पाहुण्याच्या आगमनाची आम्ही तयारी करत आहोत. मी कामात खूप व्यग्र असलो तरी मी जास्तीत जास्त वेळ उर्मिला सोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. तिला मी जितका वेळ देईल, तितका तो कमीच आहे असे मला वाटते. Also Read : ​आदिनाथ कोठारे म्हणतोय टेक केअर गुड नाईट