Join us

छोटेसे गेटटुगेदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 15:35 IST

अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता मकरंद अनासपुरे सध्या ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमात एकत्र काम करत आहेत. या कार्यक्रमाचे ...

अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता मकरंद अनासपुरे सध्या ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमात एकत्र काम करत आहेत. या कार्यक्रमाचे चित्रीकरण आणि ‘सीआयडी’ या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच एकाच स्टुडिओत सुरू होते. त्यांचे मेकअपरूमही जवळ असल्याने ब्रेकमध्ये रेणुका आणि मकरंद ‘सीआयडी’च्या टीमला भेटायला गेले. त्या दोघांनी ‘सीआयडी’च्या टीमसोबत खूप साºया गप्पा मारल्या, तसेच फोटोही काढले. याबाबत रेणुका म्हणाली, ‘‘मेकअपरूम अगदीच जवळ असल्याने आम्ही दोघं त्यांना भेटायला गेलो. या निमित्ताने शिवाजी सरांना मी कित्येक वर्षांनंतर भेटले. तसंच आदित्य श्रीवास्तव याच्यासोबत मी खूप वर्षांपूर्वी ‘नाईन मलबार हिल’ या मालिकेत काम केले होते. त्यालाही यामुळे मला अनेक वर्षांनंतर भेटण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे छोटेसे गेटटुगेदरच झाले असे मी म्हणेन.’’