Join us

​ऐका सलमान खान काय सांगतोय त्याच्या शेजाऱ्यांविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 16:51 IST

बिग बॉस या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना शेजारी शेजारी ही थिम पाहायला मिळणार आहे. यंदा बिग बॉसच्या घरातील मंडळी ...

बिग बॉस या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना शेजारी शेजारी ही थिम पाहायला मिळणार आहे. यंदा बिग बॉसच्या घरातील मंडळी दोन घरात विभागली जाणार असून ते एकमेकांचे शेजारी-शेजारी असणार आहे. त्यामुळे याच विषयाला अनुसरून बिग बॉसचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान घराच्या समोर असलेल्या रोपट्यांना पाणी देत आहे. पण ते पाणी चक्क एका वयस्क माणसाच्या चहात पडते आणि तो चिडतो तर दुसरीकडे सलमान घरातील कपडे वाळत टाकत असताना लग्न कधी करणार, आता लग्न करूनच टाक असा सल्ला त्याची एक शेजारीण देते. हा प्रोमो खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे. पण त्याचसोबत या प्रोमोचे मेकिंग देखील खूप रंजक आहे.बिग बॉसच्या या प्रोमोच्या चित्रीकरणाच्या वेळी सलमान खानने खूपच मजा मस्ती केली आहे. या प्रोमोच्या मेकिंगचा व्हिडिओ कलर्स या वाहिनीने त्यांच्या ट्विटर सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या व्हिओमध्ये चित्रीकरणाच्या वेळी सगळ्यांनी खूप मजा मस्ती केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच या प्रोमो मेकिंगमध्ये सलमानने त्याच्या शेजाऱ्यांविषयी देखील माहिती दिली आहे. सलमान खानचे शेजारी कोण आहेत कसे आहेत हे जाणून घ्यायला त्याच्या फॅन्सना नक्कीच आवडणार आहे. तो त्यांच्या शेजाऱ्यांविषयी सांगतो, शंकर असे माझ्या शेजाऱ्यांचे नाव आहे. ते एकदा झाडावरून पडले होते आणि त्यामुळे त्यांचा हात वाकडा झाला होता आणि त्या दिवसापासून ते स्वतःला दादा समजू लागले आहेत. ते सगळ्यांना घाबरवायचाच प्रयत्न करत असतात. पाहा कसे आहेत माझे हे शेजारी.बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध चेहेरे आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहेत. तसेच सामान्य लोकदेखील या बिग बॉसच्या सिझनचा भाग असणार आहे. प्रेक्षक या सिझनची आतुरतेने वाट पाहात आहेत. Also Read : 'पहरेदार पिया की मालिका' बंद झाल्यानंतर बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार का तेजस्वी वायंगणकर ?