Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोशनी झाली पुन्हा एकदा आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 15:52 IST

कसम से या मालिकेमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री रोशनी चोपडाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. रोशनीने निर्माते सिद्धार्थ आनंद कुमार ...

कसम से या मालिकेमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री रोशनी चोपडाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. रोशनीने निर्माते सिद्धार्थ आनंद कुमार यांच्यासोबत दहा वर्षांपूर्वी लग्न केले. या दोघांना तीन वर्षांचा मुलगादेखील आहे. मोठ्या मुलाच्या जन्मानंतरच रोशनीने मालिकेत काम करणे खूप कमी केले होते. या नव्या पाहुण्याचे आणि रोशनीचे तिच्या घरातल्यांनी जय्यत स्वागत केले. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव जयवीर आहे तर त्यांनी त्यांच्या या लहान मुलाचे नाव रियान ठेवले. रोशनी आणि तिचा मुलगा या दोघांचीही तब्येत अतिशय चांगली असल्याचे रोशनीची बहीण दिया सांगते.