Join us

'जीवन खूप मौल्यवान आहे..', सुसाइडनंतर हॉस्पिटलमधील Vaishali Takkarचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:42 IST

Vaishali Takkar: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली ठक्करने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली ठक्कर(Vaishali Takkar)ने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या निधनामुळे चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. वैशाली आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. मृत्यूनंतर वैशालीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने जीवन मौल्यवान असल्याचे सांगितले आहे.

वैशाली ठक्करने हा व्हिडिओ तिच्या यूट्यूब अकाऊंटवर २० सप्टेंबरला शेअर केला होता. त्याचे शीर्षक होते 'मेरे जैसे जिंदगी की झंड ना करना...' या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. वैशालीचा हा व्हिडिओ हॉस्पिटलमध्ये बनवण्यात आला होता. तिला व्हायरसची लागण झाली होता, त्यामुळे वैशालीला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या व्हिडिओमध्ये वैशाली ठक्कर चाहत्यांना जीवन मौल्यवान आहे, असे सांगत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. वैशालीच्या आत्म्याला शांती लाभो, अशी लोक प्रार्थना करत आहेत.

व्हिडीओमध्ये वैशाली सांगताना दिसतेय की, मित्रांनो, हे जीवन खूप मौल्यवान आहे. तुम्ही लोकांनी निरुपयोगी गोष्टींमुळे जीवनाची वाट लागतेय, त्या गोष्टींना आळा घाला. बाहेरचे काहीही पदार्थ खाणे, पार्ट्या करणे, पार्टनरसोबत किरकोळ भांडण झाले की देवदास सारखे दारुच्या नशेत बुडून आपले यकृत खराब करणे. वैशालीच्या म्हणण्यानुसार, तिला एका अत्यंत घातक विषाणूची लागण झाली होती. त्यामुळे तिची कावीळ वाढली होती. वैशालीने हेही सांगितले होते की तिने व्हिडीओमध्ये फ्लिटर वापरला आहे. तिचा खरा चेहरा चाहते पाहू शकत नाहीत.

वैशालीच्या मृत्यूनंतर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून काही लोकांना आश्चर्यही वाटत आहे. जीवनाला इतकं मौल्यवान मानणारी वैशाली कशी काय आपले जीवन संपवू शकते यावर त्यांचा विश्वास बसत नाही. वैशालीच्या मृत्यूवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. दरम्यान, वैशालीचा गुन्हेगार राहुल नवलानी पकडला गेल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. वैशालीने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी राहुल आणि त्याची पत्नी दिशा यांना जबाबदार धरले आहे.