‘मे आय कम इन, मॅडम?’मध्ये नोटबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 19:57 IST
मालिकांमध्ये सण-उत्सव तसेच लग्न सोहळ्यांचा नेहमीच समावेश केला जातो. मात्र सध्या मालिकांमध्ये चक्क नोटबंदीचा विषय हाताळला जात आहे. ‘मे ...
‘मे आय कम इन, मॅडम?’मध्ये नोटबंदी
मालिकांमध्ये सण-उत्सव तसेच लग्न सोहळ्यांचा नेहमीच समावेश केला जातो. मात्र सध्या मालिकांमध्ये चक्क नोटबंदीचा विषय हाताळला जात आहे. ‘मे आय कम इन, मॅडम?’ या मालिकेने नोटबंदीचा प्रचलित आणि गाजणारा विषय हाताळून प्रेक्षकांची करमणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेत नोटबंदी निर्णयाचा तडाखा साजन अग्रवाल(संदीप आनंद) यांना बसतो असे दाखविले आहे. एरवी कायम पैशाच्या तंगीत असलेला साजन अचानक पैशांच्या पुडक्यांनी मालामाल होतो. परंतु या साºया नोट सरकारने रद्द केलेल्या असतात. आता ही पैशाची बंडले निकालात काढण्यासाठी साजन प्रयत्न सुरू करतो आणि त्याचा परिणामी त्याच्या मॅडम आणि कुटुंबियांवर कसा होतो, त्याचे धमाल किस्से आगामी भागांत दाखविण्यात येणार आहेत. अर्थात या भागातून ज्यांनी काळ्या पैशांची साठवण केलेली असेल, त्यांना कोणते परिणाम भोगावे लागतील, याबाबतचा संदेशही यातून देण्यात आला आहे. यासंदर्भात संदीप आनंदने सांगितले की, सध्या देशात सुरू असलेल्या गोंधळाचा वापर आमच्या कथानकात करण्याची कल्पना आम्हाला सुचली. मालिकेचा नायक या नात्याने देशात सध्या कोणती परिस्थिती आहे, हे जनतेला साध्या स्वरुपात कळावं आणि काळ्या पैशाच्या वापराबाबत त्यांचं प्रबोधन व्हावं, याचा हा सूचक वापर आहे.