Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षर कोठारी नव्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 13:51 IST

कमला या मालिकेला प्रेक्षक आज ही विसरले नाही आहेत. या मालिकेतील देव म्हणजेच अक्षर कोठारी यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून ...

कमला या मालिकेला प्रेक्षक आज ही विसरले नाही आहेत. या मालिकेतील देव म्हणजेच अक्षर कोठारी यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आज ही देवच्या भूमिकेला प्रेक्षक विसरले नाही आहेत. आता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता चाहूल या आगामी मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षरचा या मालिकेमधील लुक खूपच हटके आहे.  या मालिकेत अक्षर हा परदेशातून शिकून नुकताच भारतात आलेल्या मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याच्या लुकपासून ते त्याच्या संवादापर्यंत त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी अक्षरने केसांचे स्ट्रेटनिंग केले, वजन कमी केले आणि दाढी काढली आहे. त्यामुळे एकंदरीतच त्याचा मालिकेमध्ये कॅज्युअल लुक असणार आहे. कमलामध्ये अक्षरने एका प्रगल्भ विचारांचा, अहंकारी, संसारी, परिस्थितीला हताश न होणाºया पत्रकाराचा रोल साकारलेला होता. पण चाहूल या मालिकेमध्ये तो नुकताच शिकून आलेल्या स्वप्नाळू मुलाचा रोल साकारत आहे. कमला या मालिकेतील देव या भूमिकेनंतर तो चाहूलमधील सर्जेरावची भूमिका बिनधास्तपणे निभाविण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी त्याने वजनदेखील कमी केले असल्याचे समजत आहे. तसेच सध्या प्रेक्षकांमध्ये चाहूल या मालिकेची चर्चा रंगू लागली आहे. या मालिकेत उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेला सर्जेराव भोसले म्हणजेच अक्षर कोठारी सुमारे एका दशकानंतर सातारा जिल्हयातील भवानीपूर या त्याच्या मूळ गावी परततो, तो त्याच्या होणा-या बायकोसह जेनिफरसह जेनिफर ही पदरेशी तरुणी सर्जेरावला त्याच्या परदेश वास्तव्या दरम्यान भेटलेली असते आणि सर्जेरावच्या प्रेमासाठी ती तिचा देश, तिची माणसं सोडून, सजेर्रावशी आणि त्याच्या माणसांशी नातं जोडायला भारतात, भवानीपुरात आली आहे. मात्र सजेर्राव आणि जेनिफर यांच्या प्रेमात, त्यांच्या लग्नात अडथळा येऊ लागतो एका अज्ञात शक्तीमुळे आणि मग प्रवास सुरू होतो एका गूढाच्या शोधाचा, एका अमानवी रहस्याच्या भेदाचा ही चाहूल आहे