Join us

चला हवा येऊ द्यामध्ये साजरी होणार गटारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 12:59 IST

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात बॉलिवुडमधील शाहरुख खान, सलमान खान, इरफान खान यांसारखे दिग्गज कलाकार झळकले आहेत. आता ...

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात बॉलिवुडमधील शाहरुख खान, सलमान खान, इरफान खान यांसारखे दिग्गज कलाकार झळकले आहेत. आता थुकरटवाडीमधील मंडळीची धमाल मस्ती पाहाण्यासाठी स्टँडअप कॉमेडियन सुनील पाल येणार आहे. थुकरटवाडीतील मंडळी नेहमीच विविध सण, समारंभ त्यांच्या पद्धतीने साजरे करत असतात. त्यात त्यांचा अतरंगीपणा हा सुरूच असतो. दिवाळी पहाटचा आगळावेगळा कार्यक्रम सादर केल्यानंतर आता ही मंडळी गटारी पहाट साजरी करणार आहेत. ही पहाट साजरी करण्यासाठी या गावात दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता संदिप पाठक, गायिका रेश्मा सोनावणे, आनंद शिंदे  आणि सुनील पाल सहभागी होणार आहेत.