Join us

"तुझ्यातलं लहान बाळ असंच कायम राहू देत", 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्रीची आईसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 18:50 IST

Sakshi Gandhi : अभिनेत्री साक्षी गांधी हिने सोशल मीडियावर शेअर केलेली आईसाठीची खास पोस्ट चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला. ही मालिका संपून बरेच महिने उलटले आहेत. मात्र, त्यातील कलाकार कायम नेटकऱ्यांच्या चर्चेत येत असतात. सध्या या मालिकेतील अवनी म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधी हिने सोशल मीडियावर शेअर केलेली आईसाठीची खास पोस्ट चर्चेत आली आहे.

साक्षी गांधी हिने आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा …. तुला कधीच थँक्यू म्हणता नाही आलं गं . आणि मला असं वाटतं की आपल्या माणसाला का म्हणावं थँक्य यू किंवा का मानावे आभार ????? पण तसं नाहीये … एक थँक्य यू तो बनता हे यार. आई हे थँक्य यू आहे , तू आम्हाला चांगली शिकवण दिलीस त्यासाठी …हे थँक्य यू आहे , तू आमच्यावर चांगले संस्कार केलेस त्यासाठी … थँक्य यू आहे , तू आम्हाला धीटपणाने जगायला शिकवलं त्यासाठी .. थँक्य यू आहे , तू आमच्यात आत्मविश्वास निर्माण केलास त्यासाठी … हे थँक्य यू आहे , प्रत्येक अडचणीत आम्हाला बाहेर काढलंस त्यासाठी …हे थँक्य यू आहे , तू मानाने जगायला शिकवलं त्यासाठी .. लोकांशी माणुसकीने वागायला शिकवलं त्यासाठी .. कुठल्याही परिस्थितीत संकटाशी दोन हात करायला शिकवले त्यासाठी …बघितलस संपतच नाहीये म्हणून म्हणत नव्हते. हाहा ….आई आय लव्ह यू गं.

तिने पुढे लिहिले की, तुझ्यातलं लहान बाळ असंच कायम राहू देत .. जगभर फिर .. स्वतःला वेळ दे … मनमोकळ हिंड..आणि माझं ऐकत जा जरा आणि मी तुझ्याशी भांडत राहणारच आहे .. कारण तुझ्याशी भांडायला मला आवडत अग … आई आय मिस यू गं. मला लवकर भेटायला ये.