Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आमचं नातं कायम असंच राहो...', जेठालालसोबत झालेल्या भांडणावर तारक मेहताने सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 18:25 IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दिलीप जोशी म्हणजेच मालिकेतील जेठालाल आणि शैलेश लोढा म्हणजे तारक मेहता यांच्यामध्ये सेटवर वाद झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता शैलेश यांनी यावर मौन सोडले आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, तारक, अंजली, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दिलीप जोशी म्हणजेच मालिकेतील जेठालाल आणि शैलेश लोढा म्हणजे तारक मेहता यांच्यामध्ये सेटवर वाद झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता शैलेश यांनी यावर मौन सोडले आहे. 

शैलेश यांनी पसरत असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आमच्यातील मैत्री अत्यंत चांगली आहे आणि आमचे नाते कायम असेच राहो... असे शैलेश यांनी म्हटले. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, शैलेश लोढा यांनी मुलाखतीत सांगितले की, दिलीप जोशी यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. त्यांच्यामध्ये खऱ्याखुऱ्या आयुष्याच चांगले मैत्रीचे नाते असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सेटवर दोघांना बेस्ट बडी म्हणून हाक मारतात. 

शैलेश पुढे म्हणाले, 'गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र काम करत आहोत. पण आमच्यात कधी वाद झाले नाहीत. मी देवाकडे प्रार्थना करतो की आमचे नाते कायम असेच राहो....'

काय आहे हे प्रकरण...तारक आणि जेठालाल हे मालिकेत बेस्ट फ्रेंड असले तरी खऱ्या आयुष्यात दिलीप जोशी आणि शैलेश लोढा एकमेकांशी बोलत देखील नसल्याचे वृत्त नवभारत टाईम्सने दिले होते. त्यांच्या वृत्तानुसार दिलीप आणि शैलेश केवळ चित्रीकरणासाठी एकत्र येतात आणि चित्रीकरण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून जातात. त्यांच्या दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून अबोला आहे. या वृत्तानंतर त्या दोघांमध्ये वाद झाल्याच्या चर्चेला उधाण आले होते. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा