Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘सुपर डान्सर’ शिल्पाला देतायत नृत्याचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2016 13:20 IST

'सुपर डान्सर' हा डान्स रियालिटी शो रसिकांची मनं जिंकू लागलाय. या शोमधील स्पर्धक आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सची जादू शोचे जज ...

'सुपर डान्सर' हा डान्स रियालिटी शो रसिकांची मनं जिंकू लागलाय. या शोमधील स्पर्धक आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सची जादू शोचे जज शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर यांच्यासह रसिकांवरही पाहायला मिळतेय. त्यांच्या एकाहून एक डान्स स्टेप्सनं सारेच अचंबित झालेत. आपल्या डान्सनं हे स्पर्धक सा-यांनाच तोंडात बोटं घालायला तर लावतायतच शिवाय जजेसलाही ते आता नृत्याचे धडे देऊ लागलेत. या शोमधील नऊ वर्षीय स्पर्धक मासूम नर्झरी हिनं आपल्या नृत्याने जज शिल्पा शेट्टीला क्लीन बोल्ड केलं. शिल्पा मासूमच्या नृत्यावर अशी काही फिदा झालीय की तिनं मासूमकडून नृत्याचे धडे घेण्याची इच्छा व्यक्त केली. पिळदार आणि लवचिक शरीरामुळं मासूम एकाहून एक सरस आणि धमाकेदार स्टेप्स करतेय. याच डान्स स्टेप्स शिकण्याची इच्छा शिल्पा मासूमकडे व्यक्त करते आणि ते शिकण्यासाठी ती चक्क शिल्पा स्टेजवर अवतरते. मासूम हिप्स स्टाईल ती शिकण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. शिल्पाने मासूमच्या डान्स स्टेप्सला मासूम वेव्ह्स असं नावंही दिलंय.