Join us

​या कारणामुळे श्वेता बासू प्रसादच्या चंद्र-नंदिनी मालिकेचे चित्रीकरण खोळंबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 12:18 IST

चंद्र-नंदिनी या मालिकेत श्वेता बासू प्रसाद ही नंदिनी आणि रूपा अशा दोन भूमिका साकारत आहे. या मालिकेचे चित्रीकऱण करत ...

चंद्र-नंदिनी या मालिकेत श्वेता बासू प्रसाद ही नंदिनी आणि रूपा अशा दोन भूमिका साकारत आहे. या मालिकेचे चित्रीकऱण करत असताना नुकतीच श्वेता बासू प्रसादला चांगलीच दुखापत झाली. या मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी सेटवर काही दिवे लावण्यात आले होते आणि या दिव्यातील तेल झिरपून ते पायऱ्यांवर सांडले होते आणि या तेलावर पाय घसरून तिला दुखापत झाली होती. या कारणांनी काही वेळासाठी मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. या गोष्टीला काहीच दिवस उलटलेले असताना पुन्हा एकदा या मालिकेच्या चित्रीकरणात व्यत्यत आला.श्वेता बासू प्रसाद या मालिकेत एक राजकन्येची भूमिका साकारते. या व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार तिचे केस मालिकेत खूप मोठे असल्याचे दाखवण्यात आले आहेत. पण खऱ्या आयुष्यात तिचे केस मोठे नसल्याने या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ती विग लावते. नुकतेच चित्रीकरण करत असताना तिच्या केसांचा विगच निघून आला. नंदिनी शाही स्नानगृहात आंघोळीला जात आहे असे दृश्य चित्रीत करायचे होते. या दृश्याच्यावेळी तिच्या केसाच्या विगमधील मोठे केस तिच्या दागिन्यांमध्ये गुंतले आणि त्यामुळे तो विगच निघाला. दागिने आणि विग खूपच गुंतले असल्याने तो गुंता सोडवण्यात सगळ्यांच्या नाकी नऊ आले होते. मालिकेच्या टीममधील अनेकजणांनी हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या तो गुंता निघतच नव्हता आणि त्यामुळे हा विग पूर्णच खराब झाला होता. हा विग पुन्हा वापरता येणार नसल्याने पुन्हा नवे विग बनवावे लागले आणि त्यासाठी खूप वेळ लागणार होता. त्यामुळे त्या दिवसाचे चित्रीकरण तिथेच थांबवावे लागले आणि चित्रीकरण एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले.