Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूमिकेसाठी आळशीपणा सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 13:56 IST

अभिनेता राजेश खेरा नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत तक्षकाची भूमिका साकारत आहे. तक्षक हा दृष्ट नाग दाखवला असल्याने ...

अभिनेता राजेश खेरा नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत तक्षकाची भूमिका साकारत आहे. तक्षक हा दृष्ट नाग दाखवला असल्याने त्याच्या व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार राजेशची शरीरयष्टी मजबूत असणे आवश्यक होती. पण राजेश खऱ्या आयुष्यात खूपच बारीक असल्याने त्याला या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. याविषयी राजेश सांगतो, "मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूपच आळशी आहे. मला व्यायाम करण्याचा खूप कंटाळा येतो. पण आता या भूमिकेसाठी मी कित्येक तास जीममध्ये घाम गाळत आहे. माझे शरीर पिळदार दिसावे यासाठी मी प्रचंड मेहनत घेत आहे."