Join us

जाणून घ्या तुमच्या लाडक्या टीव्ही कलाकारांची कमाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 10:50 IST

छोट्या पडद्यावरील स्टार आणि रसिकांचं अतूट असं नातं असतात. कारण टीव्ही मालिकांमधून ते थेट आपल्या घरात आणि घरातून आपल्या ...

छोट्या पडद्यावरील स्टार आणि रसिकांचं अतूट असं नातं असतात. कारण टीव्ही मालिकांमधून ते थेट आपल्या घरात आणि घरातून आपल्या मनात पोहचतात. आपल्या अभिनयानं दिलखुलास मनोरंजन करत ही कलाकार मंडळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यांचं रिल लाइफ आपण सारेच एन्जॉय करतो. मात्र या कलाकारांचं आयुष्य, त्यांच्या जीवनात घडणा-या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टी आणि घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या रसिकांना असते. कलाकारांची लाइफस्टाईल ही त्यांच्या कमाईवर आधारित असते. रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी या कलाकारांना मानधन मिळत असते. प्रत्येक कलाकाराला त्याच्या लोकप्रियतेनुसार मानधन मिळत असते.आता तुमच्या लाडक्या कलाकाराला किती मानधन मिळते हे तुम्हालाही जाणून घ्यायचंच असेल. चला तर तुमच्या आवडत्या टीव्ही कलाकारांचं मानधन किती हे जाणून घेऊया दिशा वकानी  लहानांपासून थोरांपर्यंत सा-यांची आवडती टीव्ही मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेली अनेक वर्ष रसिकांचं दिलखुलास मनोरंजन करत रेकॉर्ड रचणा-या या मालिकेतील दयाबेनचे तर क्या कहेने. दयाची भूमिका रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ही भूमिका साकारली आहे ती अभिनेत्री दिशा वकानी हिने. आपल्या अभिनयाने दिशा वकानी हिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी दिशा वकानी हिला तब्बल 1.4 लाख रुपये मानधन मिळते. कपिल शर्मा दिशा वकानीप्रमाणेच आपला हजरजबाबीपणा आणि कॉमेडीसह फुल ऑन एंटरटेन्मेंट करणा-या कपिल शर्मानेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी बोलता बोलता कपिलने आपल्या कमाईविषयी अप्रत्यक्ष कबुली दिली होती. वर्षाला 15 कोटी रुपये कर भरत असल्याचे कपिलने म्हटलं होतं. यावरुनच कपिलचे एका भागाचे मानधन हे 60 ते 80 लाख रुपये असल्याचे उघड झाले होते.दिव्यांका त्रिपाठी  'ये हे मोहब्बते' फेम दिव्यांका त्रिपाठी म्हणजेच रसिकांची लाडकी इशिमाँ.सध्याच्या घडीला आघाडीच्या टीव्ही कलाकारांमध्ये दिव्यांकाचं नाव घेतले जाते. मालिकेच्या एका भागाच्या शुटिंगसाठी दिव्यांकाला 1 लाख रुपये इतके मानधन मिळते.  श्रृती झा  'कुमकुम भाग्य' मालिकेतील श्रृती झा हिची लोकप्रियताही काही कमी नाही.त्यामुळेच की काय एका भागासाठी 50 ते 60 हजार रुपये इतके मानधन श्रृती घेते.  देबोलिना भट्टाचार्जी  छोट्या पडद्यावर गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेली मालिका म्हणजे साथ निभाना साथियाँ. या मालिकेतील गोपी बहूने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.या मालिकेतील गोपी बहूची भूमिका साकारणा-या देबोलिना भट्टाचार्जीचे फॅन फॉलोईंगसुद्धा बराच आहे. त्यामुळेच की काय मालिकेच्या एका भागाच्या शूटिंगसाठी देबोलिना 90 हजार ते 1 लाख रुपये इतके मानधन घेते.  दृष्टी धामी  'परदेस में है मेरा दिल' या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री दृष्टी धामी विविध शोमधून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलीय. विशेष म्हणजे सेक्सी महिलांच्या यादीतही तिला चौथा क्रमांक मिळालाय. तिच्या या अमाप लोकप्रियतेमुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्येही तिचा भाव चांगलाच वधारला आहे. मालिकेच्या एका भागाच्या शुटिंगसाठी तिला एक लाख रुपये इतके मानधन मिळते.